शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत कॉर्पोरेट एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड’ सोहळा आज रंगणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 04:07 IST

उद्योगाची कास धरतानाच सामाजिक क्षेत्रालाही हातभार लावत यशाची शिखरे पादक्रांत करणाºया व्यक्तींना ‘लोकमत’तर्फे गौरविण्यात येणार आहे; निमित्त आहे ‘लोकमत कॉर्पोरेट एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड’चे. १० मार्च (शनिवार) रोजी सायंकाळी ६ वाजता वरळी येथील फोर सिझनमध्ये हा पुरस्कार सोहळा रंगणार आहे

मुंबई  - उद्योगाची कास धरतानाच सामाजिक क्षेत्रालाही हातभार लावत यशाची शिखरे पादक्रांत करणाºया व्यक्तींना ‘लोकमत’तर्फे गौरविण्यात येणार आहे; निमित्त आहे ‘लोकमत कॉर्पोरेट एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड’चे. १० मार्च (शनिवार) रोजी सायंकाळी ६ वाजता वरळी येथील फोर सिझनमध्ये हा पुरस्कार सोहळा रंगणार आहे. सोहळ्याचे यंदाचे चौथे वर्ष आहे. कार्यक्रमाला कॉर्पोरेट क्षेत्रासह राजकीय, प्रशासन आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती लाभणार आहे.गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता, परिवहन मंत्री दिवाकर रावते, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त पल्लवी दराडे, पोलीस महानिरीक्षक कैसर खलिद, आर्थिक गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, कायदा व सुव्यवस्थेचे सहपोलीस आयुक्त देवेन भारती, गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त संजय सक्सेना, मुंबई वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त अमितेश कुमार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा, एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, सहव्यवस्थापकीय संचालक आणि संपादकीय संचालक ॠषी दर्डा यांचीही उपस्थिती असेल.सोहळ्यासाठी टायटल स्पॉन्सर मनी टेÑड कॉईन ग्रुप, पॉवर बाय मोहन ग्रुप, को-स्पॉन्सर साई इस्टेट कन्सल्टंट लिमिटेड, को-स्पॉन्सर रिजन्सी ग्रुप, ट्रॉफी पार्टनर ग्रीन लँड फार्म, आऊटडोअर पार्टनर रोनक अ‍ॅडर्व्हटायझिंग, फ्लेक्स पार्टनर विक्रांत अ‍ॅडर्व्हटायझिंग, ब्रेव्हरेज पार्टनर सुला वाईन्स, नॉलेज पार्टनर बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशन हे प्रायोजक आहेत. हा कार्यक्रम फक्त निमंत्रितांसाठी आहे.- या सोहळ्यात ‘ड्राईव्हिंग बिझनेस एक्सलन्स’ या विषयावर परिसंवाद होईल. यात युनियन बँक आॅफ इंडियाचे अध्यक्ष केवल हंडा, हरीभक्ती ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शैलेश हरीभक्ती, ‘एल अ‍ॅण्ड टी’च्या कार्यकारी समितीचे सदस्य आणि वरिष्ठ उपाध्यक्ष योगी श्रीराम, जे.के. एंटरप्रायजेस मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत सिंघानिया, डाऊनस्ट्रीमचे सल्लागार आणि संचालक व बॉम्बे मॅनेजमेंट असोसिएशनचे अध्यक्ष एम.डी. अग्रवाल, एफसीबी इंटरफेसचे उपाध्यक्ष नितीन भागवत सहभागी होणार आहेत.‘क्वालिटी आॅफ कटेंट इन एंटरटेंटमेंट बिझनेस’ या अन्य एका विषयावरच्या परिसंवादात रेनड्रॉप मीडियाच्या संस्थापक आणि संचालक रोहिनी अय्यर, निर्मात्या प्रेरणा अरोरा, अभिनेत्री आणि निर्मात्या रवीना टंडन आदी मान्यवर सहभागी होणार आहेत.

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटMaharashtraमहाराष्ट्र