लोकमत पुरस्कार सोहळा आज रंगणार!

By Admin | Updated: June 28, 2014 01:41 IST2014-06-28T01:41:44+5:302014-06-28T01:41:44+5:30

रिअल इस्टेट, इन्फ्रास्ट्रक्चर, बँकिंग फायनान्स आणि एच. आर. क्षेत्रतील मान्यवर आणि संलग्न संस्थांना पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे.

Lokmat Award ceremony will be played today! | लोकमत पुरस्कार सोहळा आज रंगणार!

लोकमत पुरस्कार सोहळा आज रंगणार!

>मुंबई : लोकमत समूहाच्या वतीने रिअल इस्टेट, इन्फ्रास्ट्रक्चर, बँकिंग फायनान्स आणि एच. आर. क्षेत्रतील मान्यवर आणि संलग्न संस्थांना पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. शनिवार, 28 जून रोजी वांद्रे येथील ताज लँड्समध्ये हा सोहळा रंगणार आहे.
लोकमत समूहाने रिअल इस्टेट आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रला प्रोत्साहन देण्यासाठी उत्कृष्ट प्रकल्प तसेच क्षेत्रतील नामांकित मंडळींना सन्मानीत करण्याचे ठरविले आहे. लोकमत अॅस्पायर एचआर लीडरशिप अॅवॉर्ड्स 2क्14 हा पुरस्कार सोहळा सकाळी 9.3क् ते दुपारी 1 या वेळेत ताज लँड्समध्ये पार पडेल. हा सन्मान सोहळा पटेल ग्रुप अँड कं. डेव्हलपर्स अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर, रिजन्सी ग्रुप आणि सिद्धीटेक होम्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहयोगाने होईल. लोकमत बीएफएसआय अॅवॉर्ड्स 2क्14 हा पुरस्कार सोहळा दुपारी 2 ते 4 या वेळेत ताज लँड्समध्ये पार पडेल. या सन्मान सोहळ्य़ाला पटेल ग्रुप अॅण्ड कं. डेव्हलपर्स अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर हे मुख्य प्रायोजक आहेत. शिवाय रिजन्सी ग्रुप, सिद्धीटेक होम्स प्रा. लि. यांचा सहयोग आहे. तर नातू परांजपे रिअॅल्टर्स आणि वास्तुरविराज हे सहप्रायोजक असणार आहेत. लोकमत रिअल इस्टेट अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर अॅवॉर्ड्स 2क्14 हा पुरस्कार सोहळा सायंकाळी 6.3क् ते 9 या वेळेत ताज लँड्समध्ये होईल. वास्तुरविराज या सन्मान सोहळ्य़ाचे सहप्रायोजक असतील. (प्रतिनिधी)

Web Title: Lokmat Award ceremony will be played today!