भरपावसात ‘लोकमत’वर बरसली ‘वाचकमाया’

By Admin | Updated: May 15, 2015 23:31 IST2015-05-15T23:26:33+5:302015-05-15T23:31:06+5:30

अलोट गर्दी : नवव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित स्नेहमेळाव्यास विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती

'Lokmat' anniversary | भरपावसात ‘लोकमत’वर बरसली ‘वाचकमाया’

भरपावसात ‘लोकमत’वर बरसली ‘वाचकमाया’

सातारा : दिवसभर शहरावर पसरलेली आभाळमाया आणि सायंकाळी भरपावसात बरसलेली ‘वाचकमाया’ अशा भारावलेल्या वातावरणात ‘लोकमत’च्या सातारा आवृत्तीचा नववा वर्धापनदिन मोठ्या थाटामाटात साजरा झाला. यानिमित्त आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्यास उपस्थित अलोट गर्दीने सातारकरांचे ‘लोकमत’वरील प्रेम पुन्हा एकदा अधोरेखित केले.
विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्नेहमेळाव्याचे उद््घाटन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील माने, बँकेचे संचालक अनिल देसाई, डॉ. सुयोग दांडेकर, डॉ. प्रताप गोळे, डॉ. जयश्री शिंदे, सिनर्जी ग्रुप आॅफ इंडस्ट्रीजचे अमोल चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते शशिकांत शिंदे, जिल्हा बँकेचे नूतन अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, (पान १० वर)

आमदार जयकुमार गोरे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांनी स्नेहमेळाव्यास हजेरी लावली.
‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले, वरिष्ठ शाखा व्यवस्थापक विजय पोवार, आवृत्तीप्रमुख सचिन जवळकोटे, मनुष्यबळ आणि प्रशासन व्यवस्थापक संतोष भोगशेट्टी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले
‘राधिका पॅलेस’मध्ये सायंंकाळी सहा वाजता स्नेहमेळावा सुरू झाला, तेव्हापासूनच विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे आगमन सुरू झाले होते. पाऊस सुरू झाला, तरी स्नेहमेळाव्यास येणाऱ्यांची संख्या वाढतच राहिली. राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, बँकिंग, सांस्कृतिक, पर्यावरण, आरोग्य, उद्योग-व्यवसाय, बांधकाम क्षेत्रांतील मान्यवर, लोकमतचे हितचिंतक, जाहिरातदार व वृत्तपत्र एजंटांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या व ‘लोकमत’च्या वर्षभरातील कामगिरीबद्दल प्रशंसोद््गार काढले. (प्रतिनिधी)

‘हेल्दी सातारा’
विशेषांकाचे प्रकाशन
वर्धापनदिनानिमित्त ‘लोकमत’ने यावर्षी ‘हेल्दी सातारा’ या विषयावरील विशेषांक तयार केला आहे. या अंकाचे प्रकाशन सकाळी श्री खिंडीतील गणपती आणि कुरणेश्वर देवस्थान येथे करण्यात आले. यावेळी ‘लोकमत’ परिवारातील
सर्व सदस्य उपस्थित होते.
गतिमान जीवनशैलीत आरोग्य टिकविणे आणि जोपासणे दिवसेंदिवस कठीण झाले असून, या पार्श्वभूमीवर ‘हेल्दी सातारा’ विशेषांक मार्गदर्शक व संग्राह्य आहे, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

Web Title: 'Lokmat' anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.