शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
4
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
5
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
6
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
7
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
8
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
9
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
10
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
11
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
12
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
13
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
14
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
15
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
16
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
17
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर
18
जखमी नवजोत सिंह आणि त्यांच्या पत्नीला २२ किलोमीटर दूर असलेल्या हॉस्पिटलमध्ये का घेऊन गेली गगनप्रीत? झाला खुलासा!
19
PM Modi Turns 75: वयाची ७५ वी अमृत महोत्सव म्हणून का साजरी केली जाते? सनातन धर्मात सापडते उत्तर 

महाराष्ट्रात महायुतीला फटका?; मविआला मिळणार कौल, सर्व्हेच्या आकडेवारीनं धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2023 08:40 IST

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा विजयाची हॅट्रीक करेल असा दावा भाजपा नेते करत आहेत. तर दुसरीकडे २८ पक्षांच्या विरोधी इंडिया आघाडीनेही शड्डू ठोकत भाजपाचा पराभव होणारच असं म्हणत आहे

मुंबई - Survey on Loksabha Election ( Marathi News ) लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर एकीकडे भाजपा आणि काँग्रेससह सर्व राजकीय पक्षांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. अलीकडेच झालेल्या ५ राज्यांच्या निवडणुकांमध्ये ३ राज्यात भाजपानं जबरदस्त यश पटकावलं. या विजयामुळे भाजपा नेत्यांमध्ये लोकसभा निवडणुकीत विजय मिळणार आणि पुन्हा एकदा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान होतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे. 

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा विजयाची हॅट्रीक करेल असा दावा भाजपा नेते करत आहेत. तर दुसरीकडे २८ पक्षांच्या विरोधी इंडिया आघाडीनेही शड्डू ठोकत भाजपाचा पराभव होणारच असं म्हणत आहे. त्यामुळे पुढील लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी की एनडीए यात कोण बाजी मारेल हा मोठा प्रश्न आहे. यात एबीपी या हिंदी वृत्तवाहिनीनं सी वोटरच्या माध्यमातून जनतेच्या मनातील कौल घेण्याचा प्रयत्न केला आहे. जर आज लोकसभा निवडणुका झाल्या तर त्यात कोणाचा विजय होईल आणि कुणाच्या पदरी निराशा येईल यावर देशातील ५ राज्यातील आकडे हैराण करणारे आहेत. या ५ राज्यात पंजाब, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेश यात एकूण २२३ लोकसभा जागा आहेत. या जागांवरून देशातील सत्ता कोणाच्या हाती जाईल हे निश्चित होते. 

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एकूण ४८ जागा आहेत. इथं काँग्रेस-उबाठा-राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीचा पगडा भारी असल्याचं दिसून येते. जर महाराष्ट्रात आज लोकसभा निवडणुका झाल्या तर सर्व्हेनुसार, इथं महायुतीला १९-२१ जागा तर महाविकास आघाडीला २६-२८ जागा आणि इतरांना ०-२ जागा मिळतील असा अंदाज आहे. तर मतांच्या टक्केवारीत महायुतीला ३७ टक्के, काँग्रेसला ४१ टक्के आणि अन्य २२ टक्के मते मिळतील असं बोलले जात आहे. 

२०१९ नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच उलथापालथ झाल्याचं दिसून आले. त्यात सुरुवातीला मुख्यमंत्रिपदावरून भाजपा-शिवसेना युती मोडली आणि राज्यात पहिल्यांदाच कट्टर विरोधी पक्ष असलेले शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडी बनली. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाले. परंतु अवघ्या अडीच वर्षात शिवसेनेत मोठी फूट पडली. त्यानंतर एकनाथ शिंदेंसह ४० आमदार भाजपासोबत गेले. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.राज्यात पुन्हा भाजपा आघाडीचं सरकार आले. त्यानंतर अवघ्या वर्षभरातच शरद पवारांच्या राष्ट्रवादीतही मोठी फूट पडली. अजित पवारांसह ४३ आमदार सत्तेत महायुतीसोबत सहभागी झाले. त्यामुळे राज्यातील प्रमुख २ प्रादेशिक पक्षात पडलेल्या या फुटीमुळे राजकीय चित्रच पालटले. अशातच आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत असणार आहे. त्यात जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी सगळेच पक्ष तयारी करत आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत कोण विजयी होईल हे निकालानंतरच स्पष्ट होईल.  

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपाlok sabhaलोकसभाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी