शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींकडे दिला पंतप्रधानपदाचा राजीनामा, लोकसभा भंग करण्याची केली शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 14:51 IST

Lok Sabha Election Result 2024: आज होणाऱ्या एनडीएमधील घटक पक्षांच्या बैठकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राष्ट्रपती भवन येथे जात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू याची भेट घेत त्यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. तसेच जुनी लोकसभा भंग करण्याची शिफारस केली आहे.

लोकसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाल्यानंतर आता नवे सरकार स्थापन करण्यासाठीचा हालचाली सुरू झाल्या आहे. त्यासाठी आज संध्याकाळी एनडीएच्या घटक पक्षांची बैठक दिल्लीमध्ये होत आहे. या बैठकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवन येथे जात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू याची भेट घेत त्यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. तसेच जुनी लोकसभा भंग करण्याची शिफारस केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला पदाचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला असून, नव्या सरकारची स्थापना होईपर्यंत त्यांना आणि त्यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाला कामकाज पाहण्याची सूचना राष्ट्रपतींनी दिली आहे. दरम्यान, पंतप्रधान आज होणाऱ्या एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदी हे आपल्या राजीनाम्याची माहिती देतील. त्यानंतर एनडीएचा नवा नेता निवडण्याची प्रक्रिया सुरू होईल.

काल लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांमधून दहा वर्षांपासून देशात सत्ता असलेल्या भाजपाला मोठा धक्का बसला होता. दोन वेळा बहुमतासह सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपाला यावेळी बहुमताने हुलकावणी दिली. मागच्या वेळी ३०३ जागा जिंकणाऱ्या भाजपाला यावेळी २४० जागा मिळाल्या आहे. मात्र भाजपाच्या नेतृत्वाखील एनडीएला २९४ जागा मिळाल्या आहेत. मात्र भाजपाकडे स्वत:चं बहुमत नसल्याने भाजपासमोर सत्तास्थापनेसाठी अडचणी अडचणी येतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे. 

 

दरम्यान, दिल्लीमध्ये सत्तास्थापनेसाठी हालचाली होत असतानाच नव्या सरकारच्या शपथविधीची तारीख आणि वेळही निश्चित करण्यात आली आहे. ८ जून रोजी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.  तसेच तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेताच नरेंद्र मोदींच्या नावावर एक नवा विक्रम होणार आहे. सलग तिसऱ्यांदा निवडणूक जिंकून देशाचे पंतप्रधान होणारे ते देशातील दुसरे नेते बनतील.

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीCentral Governmentकेंद्र सरकारDraupadi Murmuद्रौपदी मुर्मू