शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राने BJP ला नाकारलेलं नाही; फडणवीसांनी आकडेवारी दिली, पराभवाची कारणंही सांगितली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2024 15:11 IST

"देशभरात 'इंडी' आघाडीला जेवढ्या जागा मिळाल्या, त्यापेक्षा जास्त एकट्या BJP ला मिळाल्या आहेत. त्यामुळे देशात तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात NDAची सत्ता स्थापन होईल."

मुंबई : यंदाच्या लोकसभा निवढणुकीत (Lok Sabha Election 2024) भाजपच्या नेतृत्वातील NDA ला अपेक्षित यश मिळाले नाही. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल राजस्थान आणि महाराष्ट्रात भाजपला सर्वाधिक फटका बसला. या निकालानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पराभवाची संपूर्ण जबाबदारी स्विकारली. तसेच, या निवडणुकीत भाजप आणि विरोधकांना मिळालेल्या मतांची संपूर्ण आकडेवारीही मांडली.

विरोधकांनी युकीचा नरेटिव्ह सेट केलाफडणवीस म्हणाले की, "देशभरात 'इंडी' आघाडीला जेवढ्या जागा मिळाल्या, त्यापेक्षा जास्त एकट्या BJP ला मिळाल्या आहेत. विरोधकांनी मिळून एक मोठा नरेटिव्ह सेट केला होता, त्याचा आम्हाला फटका बसला. पण, तरीदेखील भाजपच देशात सर्वात मोठा पक्ष बनला आहे. त्यामुळे देशात तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात NDAची सत्ता स्थापन होईल. नक्कीच महाराष्ट्रात आम्हाला अपेक्षित यश मिळाले नाही."

"राज्यात आमची लढाई महाविकास आघाडीच्या तीन पक्षांशी होती. त्यांनीदेखील संविधान बदलणार, मराठा आंदोलन आणि अल्पसंख्यांकाबाबत एक नरेटिव्ह तयार केला. काही प्रमाणात अल्पसंख्यकाचे ध्रुवीकरण झाले, त्याचाही आम्हाला फटका बसला आहे. शिवाय, आमच्या काही उमेदवारांबाबत अँटी इन्कबन्सी होती, ती आम्ही ओळखू शकलो नाही. काही ठिकाणी शेतकऱ्यांचे स्थानिक मुद्दे होते, त्याचा मतांवर परिणाम झाला. काही भागांमध्ये मराठा आरक्षणाबाबत चुकीचा नरेटिव्ह तयार करण्यात आला. विशेषत: मराठवाड्यात आम्ही खुप मागे पडलोत. पण, मतदारांचा जनादेश मान्य करुन आम्ही पुढच्या तयारीला लागलो आहोत," असे फडणवीस म्हणाले.

अशी आहे मतांची आकडेवारी यावेळी फडणवीसांनी महायुती आणि महाविकास आघाडीला मिळालेल्या मतांची आकडेवारी मांडली ते म्हणाले की, "आम्ही नक्कीच खुप कमी जागा जिंकल्या आहेत, पण एकूण महाविकास आघाडीला 43.91 टक्के मतदान मिळाले अन् आम्हाला 43.60 टक्के मिळले. अर्धा टक्क्यापेक्षा कमी फरकाने आम्हाला अपेक्षित यश मिळू शकले नाही. मतांची संख्या बघितली तर, त्यांना 2 कोटी 50 लाख मते मिळाली अन् आम्हाला 2 कोटी 48 लाख मते मिळाली. म्हणजेच, अवघ्या 2 लाख 3 हजार 192 मतांनी आमचा पराभव झाला आहे." 

मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांची उपमुख्यमंत्रिपद सोडण्याची इच्छा; पक्षनेतृत्वाला केली विनंती

"फक्त मुंबईचा विचार केला, तर मुंबईत विरोधकांना 24 लाख मते अन् आम्हाला 26 लाख मते मिळाली आहेत. तसेच, आमच्या 8 जागा चार टक्क्यांपेक्षा कमी फरकाने आणि 6 जागा फक्त 30 हजारांच्या फरकाने गमावल्या आहेत. काही जागा तर 2-4 हजारांच्या फरकाने हरलो आहोत. याचाच अर्थ ही निवडूक अतिशय ठासून झाली आहे. थोडीफार कमतरता आल्यामुळे आम्ही मागे राहिलो. 2019 मध्ये आम्हाला 27.83 टक्के मते मिळाली होती अन् 23 जागा  जिंकल्या होत्या. आता दीड टक्क्याने कमी आहोत अन् 9 वर आलो आहोत. 2019 मध्ये काँग्रेसला 16 ट्केक मते आणि एक जागा होती, आता 17 टक्के आणि 14 जागा झाल्या आहेत. याचा अर्थ आम्हाला जनतेते नाकारले असे होते नाही. आम्ही अगदी थोड्या फरकाने पराभूत झालो आहोत," असेही फडणवीस म्हणाले. 

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाcongressकाँग्रेस