शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
5
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
6
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
7
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
8
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
9
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
10
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
11
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
12
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
13
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
14
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
15
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
16
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
17
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
18
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
19
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
20
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2024 : विशाल पाटील : वसंतदादा घराण्यातील सहावा खासदार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2024 13:49 IST

Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्राचे चारवेळा मुख्यमंत्रिपद सांभाळणारे वसंतदादा पाटील यांच्या घराण्याची महाराष्ट्रात वेगळी ओळख निर्माण झाली हाेती.

काेल्हापूर : सांगली जिल्ह्याचे राजकारण आजदेखील दिवंगत नेते वसंतदादा पाटील यांच्या नावाभाेवती पिंगा घालत असते. महाराष्ट्राचे चारवेळा मुख्यमंत्रिपद सांभाळणारे वसंतदादा पाटील यांच्या घराण्याची महाराष्ट्रात वेगळी ओळख निर्माण झाली हाेती. सांगलीतून अपक्ष लढणाऱ्या त्यांच्या नातवाच्या रूपाने घराण्यात सहावा खासदार झाला.

सांगली लाेकसभा मतदारसंघाच्या दाेन पाेटनिवडणुकांसह १९ निवडणुका झाल्या. त्यापैकी १९५७ ची शेकापने जिंकली. २०१४ आणि २०१९ची भाजपचे संजय पाटील यांनी जिंकली. उर्वरित १६ निवडणुका काँग्रेसने जिंकल्या आहेत. त्यापैकी पाच निवडणुका वसंतदादा पाटील यांच्या सहकाऱ्यांनी जिंकल्या. १९८० मध्ये स्वत: वसंतदादा पाटील यांनी श्रीमती इंदिरा गांधी यांच्या आग्रहामुळे निवडणूक लढविली. त्यानंतर सलग दहा निवडणुका वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातील सदस्यांनी लढविल्या आणि जिंकल्या. २०१४ मध्ये पहिला आणि २०१९ दुसरा पराभव झाला. काल पुन्हा एकदा अपक्ष म्हणून विशाल प्रकाशबापू पाटील यांनी भाजपचे संजय पाटील यांचा पराभव करीत निवडणूक जिंकली.

प्रतीक प्रकाशबापू पाटील यांचा २००९ मध्ये विजय झाल्यावर त्यांची केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपदी वर्णी लागली हाेती. सांगली जिल्ह्यातील पहिलेच केंद्रीय मंत्रिपद हाेते. त्यांचा २०१४ च्या निवडणुकीत पराभव झाला. तत्पूर्वी १९९९ मध्ये काँग्रेसचे प्रकाशबापू पाटील विरुद्ध राष्ट्रवादीचे मदन पाटील यांच्यात लढत हाेऊन मदन पाटील यांचा पराभव झाला हाेता. २०१९ मध्ये विशाल पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली नाही. या निवडणुकीतही महाआघाडीतून काॅंग्रेसला उमेदवारी मिळाली नाही. विशाल पाटील यांनी बंड करून अपक्ष खासदार म्हणून निवडून आले. त्यांनी हॅटट्रिकच्या तयारीत असणारे भाजपचे संजय पाटील यांचा पराभव केला.

सहावा विशाल वसंतदादा पाटील यांच्या घराण्यातील खालील सदस्यांनी निवडणुका लढविल्या आणि जिंकल्या (कंसात निवडणूक वर्ष) | वसंतदादा पाटील (१९८०)  | शालिनीताई पाटील (१९८३ पाेटनिवडणूक)  | प्रकाशबापू पाटील (१९८४, १९८९, १९९१, १९९९, २००४)  | मदन पाटील (१९९६, १९९८)  | प्रतीक पाटील (२००५ पाेटनिवडणूक, २००९) nविशाल पाटील (२०२४)

टॅग्स :vishal patilविशाल पाटीलsangli-pcसांगलीlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४