शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंच्या भूमिकेबद्दल नाराजीचा सूर, महाविकास आघाडीची चार तास बैठक

By दीपक भातुसे | Updated: March 29, 2024 06:53 IST

Lok Sabha Election 2024 : गुरुवारी महाविकास आघाडीची जागा वाटप आणि निवडणुकीच्या तयारीसंदर्भात महत्त्वाची बैठक ट्रायडंट हॉटेल येथे झाली.

मुंबई : महाविकास आघाडीत जागा वाटप अंतिम झाले नसताना, तसेच ज्या जागांवर वाद आहेत, अशा जागांवरही उमेदवार जाहीर केल्याने उद्धव ठाकरेंबद्दलशरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. 

गुरुवारी महाविकास आघाडीची जागा वाटप आणि निवडणुकीच्या तयारीसंदर्भात महत्त्वाची बैठक ट्रायडंट हॉटेल येथे झाली. चार तास चाललेल्या या बैठकीला उद्धव ठाकरे, शरद पवार गटाकडून शरद पवार यांच्यासह जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, तर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. 

सांगली आणि दक्षिण मुंबई या जागांवर काँग्रेसने दावा सांगितला असताना तसेच या जागांबाबत निर्णय झाला नसताना उद्धव ठाकरेंनी उमेदवार जाहीर केले आहेत. या संदर्भात बैठकीत शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांनी ठाकरेंकडे नाराजी व्यक्त केली. 

काँग्रेसने या जागांवरील दावा सोडलेला नसून हा विषय बैठकीत अनिर्णयीत राहिल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. सांगलीच्या जागेचा निर्णय आता दिल्लीतूनच होईल, असेही सांगण्यात आले.

'भिवंडी आमची आहे'भिवडीची जागा कुणाच्या वाट्याला जाणार याबाबत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारले असता 'भिवंडी आमची आहे, आमचीच राहणार' असे ठाम विधान केले आहे.

काही विषय प्रलंबित आहेत, एका दिवसात सर्व ४८ जागांचा प्रश्न सुटणार नाही, आमचा समन्वय सुरू आहे. जे प्रश्न सुटलेले नाहीत, त्याची चर्चा सुरू आहे. कुठल्याही जागेबद्दल मी बोलणार नाही. बैठकीत जाहिरातींसंदर्भात सादरीकरण झाले आणि त्यावर चर्चा झाली.- पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस नेते 

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणMahavikas Aghadiमहाविकास आघाडी