शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मविआमध्ये ठाकरे गटच मोठा भाऊ, पण जागा किती मिळणार? समोर येतोय असा आकडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 16:59 IST

Lok sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपासह महायुतीचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीकडून मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. दरम्यान, महाविकास आघाडीमधील काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर येत आहे.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपासह महायुतीचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीकडून मोर्चेबांधणी करण्यात येत आहे. दरम्यान, महाविकास आघाडीमधीलकाँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार गटामध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, कोण किती जागांवर लढेल याबाबतचा अंतिम निर्णय हा महाराष्ट्राबाबत इंडिया आघाडीच्या होणाऱ्या बैठकीमध्ये होणार आहे. 

महाराष्ट्रातील आघाडीबाबत दिल्लीत काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांच्या निवासस्थानी बैठक होणार आहे. सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार या बैठकीमध्ये काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि नाना पटोले उपस्थित राहणार आहेत. तर ठाकरे गटाकडून संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून जितेंद्र आव्हाड हे बैठकीत सहभागी होणार आहेत. दरम्यान, सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार दिल्लीमध्ये महाविकास आघाडीची मोठी बैठक होणार आहे, त्यामध्ये जागावाटपाबाबत चर्चा होणार आहे. १४ आणि १५ जानेवारीदरम्यान, ही बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत सोनिया गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे सहभागी होऊ शकतात. त्यात जागावाटपाबाबत अंतिम निर्णय होऊ शकतो.

दरम्यान, या बैठकीपूर्वी सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटच मोठ्या भावाच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. राज्यातील लोकसभेच्या एकून ४८ जागांपैकी १५ जागा ठाकरे गटाला, तर काँग्रेस आणि शरद पवार गटाला प्रत्येकी १४ जागा  मिळण्याची शक्यता आहे. तर उर्वरित जागा मित्र पक्षांना मिळू शकतात. मात्र जागावाटपाच्या चर्चेत कांग्रेस २२, ठाकरे गट २३ आणि शरद पवार गट २० जागांवर दावेदारी  करू शकतात.

महाराष्ट्रातील जागाटपाबाबत प्रतिक्रिया देताना ठाकरे गटाचे नेत संजय राऊत यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील जागावाटपाबत दिल्लीत बैठक बोलवाण्यात आली आहे. कोण कुठून लढेल याबबत  त्यात चर्चा होईल. एक दोन जागांवर वाद होऊ शकतो. त्यावर चर्चा करू शकतो.  

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेसSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेlok sabhaलोकसभा