शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या गर्वाच्या फुग्याला टाचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 11:20 IST

Maharashtra Lok Sabha Election 2024 Result: भाजपचा पराभव होणार, हे आमचे म्हणणे अखेर खरे ठरले. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्या कुटुंबातील सदस्य म्हणून स्थान दिले आणि त्यांनीही महाराष्ट्रातल्या जनतेचे मन जाणले हेच सत्य आहे. महाराष्ट्र ही भावनिक भूमी आहे. इथे भावनांना अधिक महत्त्व दिले जाते.

- ॲड. हर्षल प्रधान(प्रवक्ते, उद्धवसेना) 

भाजपचा पराभव होणार, हे आमचे म्हणणे अखेर खरे ठरले. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्या कुटुंबातील सदस्य म्हणून स्थान दिले आणि त्यांनीही महाराष्ट्रातल्या जनतेचे मन जाणले हेच सत्य आहे. महाराष्ट्र ही भावनिक भूमी आहे. इथे भावनांना अधिक महत्त्व दिले जाते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना नकली संतान म्हणणाऱ्यांना धडा शिकवायलाच हवा, या निश्चयाने महाराष्ट्रातील मतदार मतदान करण्यास उत्सुक होते. 

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदावर असताना कोरोनाच्या संकटावर मात करताना, मुंबई-महाराष्ट्रातील जनतेला आपल्या नियोजनबद्ध कामगिरीचा आणि प्रशासनावरील वचक कसा असावा याचा परिचय करून दिला. संकट काळात राज्याच्या प्रमुखाने कसे वागावे, सर्वसमावेशक धोरणे कशी राबवावित याचे उदाहरण रेखाटले. मुंबईतील धारावी, वरळी या वस्त्यांमधील जनता ही कोरोनाच्या काळात किती शिस्तबद्ध नियोजनाने वावरत होती हे जगाने पाहिले आणि त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे जगभरात कौतुकही झाले होते. राज्यातील जनतेने याच काळात उद्धव ठाकरे यांना आपल्या परिवारात सामावून घेतले होते. त्यामुळे त्यांच्या बाबतीत भाजपने केलेले राजकारण, त्यांचा पक्ष फोडण्याचे, पक्षाचे नाव - चिन्ह काढून घेण्याचे केलेले घृणास्पद कारस्थान महाराष्ट्रातल्या जनतेला रुचले नाही. 

तसेही भाजपच्या विरोधात मुंबई-महाराष्ट्रात वातावरण होतेच. ठाणे, पालघर आणि कोकण पट्ट्यातील निकाल निश्चितच अनाकलनीय आणि दुःख देणारे आहेत. त्यास कारणीभूत ठरलेल्या घटकांचे  विश्लेषण आणि परीक्षण पक्षांतर्गत बैठकीत निश्चितपणे केले जाईल.  

     मुंबई ही हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचीच होती आहे आणि राहणार यावर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले.      ठाणे, पालघर आणि कोकण पट्ट्यातील निकाल निश्चितच अनाकलनीय आणि दुःख देणारे आहेत.     भाजपला या निकालांनी मात्र ‘गर्वाचे घर खाली’ या म्हणीचा अर्थ निश्चित कळला असावा.     मतदारांनी भाजपचे गर्वहरण करण्याचे ठरवले होतेच आणि तेच या निकालातून स्पष्ट झाले.     उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार हेच महाराष्ट्रातील असली नेते आहेत हेच जनतेने या निकालांनी अधोरेखित केले हे स्पष्ट आहे.  

लढाऊ वृत्ती भावलीउद्धव ठाकरे यांच्याप्रति असणारी सहानुभूतीची लाट जाणवत होती. त्यात उद्धव यांची विनम्रता, सच्चाई आणि सर्वस्व हरपूनही जिद्दीने लढण्याची वृत्ती जनतेला भावली आणि म्हणूनच  उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रातील जनतेने मनापासून पाठिंबा देत भाजपचा गर्वाचा वारू रोखण्यात उद्धव यांना साथ देत महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. 

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना