शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
3
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
4
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
5
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
6
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
7
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
8
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
9
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
10
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
11
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
12
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
13
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
14
किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
15
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
16
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
17
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
18
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
19
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
20
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश

लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरणार 'नारी शक्ती'; महिला मतदारांच्या संख्येत मोठी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 18:35 IST

Loksabha Election 2024: निवडणुकीच्या काळात महिला मतदारांवर प्रत्येक पक्षाचं लक्ष असतं, महिला मतदार या मतदानात निर्णयाक भूमिका बजावतात. त्यात यंदा महिला मतदारांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येते. 

मुंबई - Women voters in Maharashtra ( Marathi News ) पाच टप्प्यात होणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य ठरविण्यात यंदा महिला मतदारांचा महत्वाचा वाटा असेल. कारण २००४, २००९, २०१४, आणि २०१९ च्या तुलनेपेक्षा २०२४ मध्ये महिला मतदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचं दिसून येते. त्यामुळे भविष्यात कुणाचं सरकार देशात येणार हे ठरवण्यात महिलांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. 

२००४ मध्ये पुरुष आणि महिला मतदार अशी स्वतंत्र नोंदणी करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे त्यावर्षी एकूण ३ कोटी ४२ लाख ६३ हजार ३१७ मतदारांची नोंदणी झाली. २००९ आणि २०१४ या दोन्ही लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या मतदार नोंदणीमध्ये महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा कमी होती. मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या मतदार नोंदणीत महिला मतदारांची संख्या वाढली आहे. २०११ च्या जनगणनेनुसार १ हजार पुरुषांमागे ९२५ महिला असे प्रमाण होते. सन २०१४ मध्ये मतदार यादीतील महिलांचे प्रमाण १ हजार पुरुषांमागे ८८९ महिला इतके होते. सन २०१९ मध्ये १ हजार पुरुषांमागे ९११ महिला असे प्रमाण होते. २०२४ मध्ये  १ हजार पुरुषांमागे ९२३ महिला अशी लक्षणीय सुधारणा झाली आहे.

स्वीप अभियान

महिला मतदार जागृतीसाठी भारत निवडणूक आयोग, 'स्‍वीप' (SVEEP-Systematic Voters Education and Elector Participation) कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवित आहे. महिला मतदारांची संख्या वाढविणे हा या अभियानाचे महत्वाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी अंगणवाडीसेविका, आशा कर्मचारी, परिचारिका, महिला बचत गट, अशासकीय संस्‍था आदींचे सहकार्य महिला मतदारांची नोंदणी वाढविण्यासाठी घेण्यात येत आहे. शिवाय उद्योग, शिक्षण, सामाजिक, साहित्य, कला-संस्कृती यासह विविध क्षेत्रातील अग्रणी महिलांच्‍या माध्‍यमातून महिलांना मतदार नोंदणीसाठी प्रोत्‍साहित करण्यात येत आहे.

एकूण मतदार

२०१९ मध्ये एकूण मतदार ८ कोटी ८६ लाख ७६ हजार ९४६ मतदार असल्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये ४ कोटी ६४ लाख २५ हजार ३४८ पुरुष मतदार आहेत. तर ४ कोटी २२ लाख ७९ हजार १९२ महिला मतदार आणि २ हजार ४०६ तृतीयपंथी मतदार होते. २०२४ मध्ये ५ एप्रिल २०२४ नुसार एकूण ९ कोटी २६ लाख ३७ हजार २३० एकूण मतदार असल्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये ४ कोटी ८६ लाख ०४ हजार ७९८ पुरुष मतदार आहेत. तर ४ कोटी ४४ लाख १६ हजार ८१४ महिला मतदार आणि ५ हजार ६१८ तृतीयपंथी मतदार आहेत.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग