शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

शिंदे गटातील ५-६ आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात, लोकसभेतील पराभवानंतर एकनाथ शिंदेंना बसणार मोठा धक्का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 11:56 IST

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाने लढवलेल्या १५ जागांपैकी केवळ ७ जागांवर शिंदेंचे खासदार निवडून आले आहेत. शिंदे गट या धक्क्यातून सावरत असतानाच आता एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाला मोठा धक्का देऊ शकते अशी माहिती समोर आली आहे.

दोन वर्षांपूर्वी बंडाचा झेंडा खांद्यावर घेत शिवसेनेमध्ये उभी फूट पाडणाऱ्या एकनाथ शिंदे यांना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी लढवलेल्या १५ जागांपैकी केवळ ७ जागांवर शिंदेंचे खासदार निवडून आले आहेत. तर शिवसेना शिंदे गटाचा समावेश असलेल्या महायुतीचीही या निवडणुकीत मोठी पिछेहाट झाली आहे. शिंदे गट या धक्क्यातून सावरत असतानाच आता एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाला मोठा धक्का देऊ शकते अशी माहिती समोर आली आहे. लोकसभा निवडणूक आणि निकालादरम्यान, शिंदे गटातील ५ ते ६ आमदार हे उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात येत आहे. 

लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या शिंदेसेनेमधील  ५ ते ६ आमदार हे उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेच्या ठाकरे गटातील एका बड्या नेत्याने केला आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने या संदर्भातील वृत्त प्रसारित केले आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान आणि निकालांनंतर हे आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र हे आमदार कोण आणि कुठल्या भागातील आहेत, याबाबतची माहिती समोर आलेली नाही. 

नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाने १५ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी ७ जागांवर शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले. तर आठ जागांवर त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तसेच शिवसेना ठाकरे गटाने २१ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी ९ जागांवर त्यांना विजय मिळाला. तर १२ जागांवर ठाकरे गटाला पराभूत व्हावं लागलं होतं. 

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे