शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

उमेदवारांनो, शक्तिप्रदर्शन करताना जपून; कार्यकर्त्यांच्या गाड्यांचा खर्चही निवडणूक खर्चात मोजणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 6:15 AM

आवश्यकतेनुसार मुंबई पोलिस दल आणि महापालिका यांच्याकडे असणारे आवश्यक ते सीसीटीव्ही फुटेज देखील काळजीपूर्वक पडताळून पाहा

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र भरताना केल्या जाणाऱ्या शक्तिप्रदर्शनावर आता निवडणूक आयोगाची करडी नजर राहणार आहे. शक्तिप्रदर्शनावेळी मिरवणुकांमध्ये सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांकडून आणल्या जाणाऱ्या वाहनांचा खर्चही आता उमेदवाराच्या निवडणूक खर्चात समाविष्ट केला जाणार आहे. त्यामुळे या मिरवणुकीतील कार्यकर्त्यांची संख्या, वाहने आणि केल्या जाणाऱ्या खर्चाची व्हिडीओसह छायाचित्रांची नोंद ठेवण्याचे निर्देश ‘दक्षिण मध्य मुंबई’चे निवडणूक निर्णय अधिकारी तथा कोकण विभागाचे अपर आयुक्त विकास पानसरे यांनी दिले आहेत. 

ओल्ड कस्टम इमारतीच्या सभागृहात गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला मार्गदर्शन करताना पानसरे यांनी हे आदेश दिले. यावेळी भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी प्रवीण मुंडे यांच्यासोबत जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि मुंबई पोलिस दलातील संबंधित अधिकारी उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यात मुंबई शहर-जिल्ह्यातील दोन लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या टप्प्यासाठी नामांकन भरण्याची प्रक्रिया सुरु होत आहे. नामनिर्देशनपत्रे भरण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांसमवेत मोठ्या संख्येने कार्यकर्ते मिरवणूक स्वरूपात येत असतात. या कार्यकर्त्यांची संख्या, त्यांच्या वाहनांचे क्रमांक आणि वाहनांचा तपशील, मिरवणुकीदरम्यान वितरित होणारे खाद्यपदार्थ इत्यादींवर कडक आणि काळजीपूर्वक लक्ष ठेवा. यासाठी आवश्यकतेनुसार मुंबई पोलिस दल आणि महापालिका यांच्याकडे असणारे आवश्यक ते सीसीटीव्ही फुटेज देखील काळजीपूर्वक पडताळून पाहा, असे आदेश पानसरे यांनी निवडणूक कर्मचाऱ्यांना दिले आहेत. त्याचबरोबर नामनिर्देशनपत्र भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या उमेदवारांसोबत जास्तीत जास्त ३ वाहने आणि ५ व्यक्तींनाच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात येण्याची मुभा असेल, असेही पानसरे यांनी नमूद केले आहे. 

वाहनांवर झेंडे व प्रचार साहित्य लावण्यासाठी संबंधित सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि आरटीओ यांची परवानगी घेणे आवश्यक असते. ही परवानगी न घेता झेंडे लावल्याचे आढळून आल्यास सदर वाहने आचारसंहिता संपेपर्यंत अडकवून ठेवण्याची कारवाई करण्याचे आदेशही या बैठकीत देण्यात आले.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४