शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

काही जण भावनिक करतात, पक्ष चोरला, चोरला, आम्ही चोरटे आहोत का?; अजित पवार कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 16:53 IST

Lok sabha Election - बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांचा प्रचार करताना अजित पवारांनी पक्ष चोरला असा आरोप करणाऱ्या टीकाकारांना फटकारलं आहे. 

बारामती - Ajit Pawar in Baramati ( Marathi News ) गेली अनेक वर्ष तुम्ही घड्याळाचं बटण दाबताय, तिथेच मतदान करा. आम्ही कुणी पक्ष चोरला नाही. एकनाथ शिंदेंनेही नाही आणि मीदेखील नाही. आज ८० टक्के लोक सोबत असल्याने निवडणूक आयोगाने हा निकाल दिला आहे. काहीजण भावनिक करतात, पक्ष चोरला, चोरला, आम्ही चोरटे आहोत का? दरोडेखोर आहोत का? आम्ही काम करणारी माणसं आहोत अशा शब्दात अजित पवारांनी विरोधकांना फटकारलं आहे.

अजित पवार म्हणाले की, माझ्यात अजून ५-१० वर्ष काम करण्याची धमक, ताकद आहे. तसं इतरांनी काय काम केले हे तुम्हाला माहिती आहे. अजूनही किती कार्यकर्त्यांची नावं त्यांना माहिती नाही. इतके दिवस माझी मोठ्या लोकांची ओळख नव्हती. मी कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. ९० साली मी राजकारण सुरू केले. ९० पासून गेल्या निवडणुकीपर्यंत बारामतीत अर्ज भरल्यानंतर शेवटच्या सभेसाठी यायचे. आता गावोगावी फिरतात, का मला विरोध करतात? मी इतके  वर्ष साथ दिली नाही? कशात कमी पडलो? तुम्ही भावनिक होऊ नका ७ तारखेचे मतदान झाल्यावर यांच्यातील २-४ लोकांनी परदेश दौरा केला नाही तर नावाचा अजित पवार नाही असंही त्यांनी म्हटलं. 

तसेच आता उगीच येतात, काही काही सांगतायेत, आम्ही टँकर देऊ, चारा देऊ, डेपो उभा करू असं सांगतायेत. ७ तारखेनंतर यातील कुणी येणार नाही. नंतर मीच आहे. महायुतीच आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीसच मदत करणार आहे. आपत्कालीन परिस्थितीबाबत जी कमिटी आहे त्याचे प्रमुख अमित शाह आहे. कुठेही आपत्कालीन स्थिती आली तर केंद्र मदत करते. आम्ही कुणीही तुम्हाला पैसा कमी पडू देणार नाही. जुना काळ बाजूला ठेवा, आता नवीन काळ बघा, सासूचे ४ दिवस संपले आणि सुनेचे ४ दिवस येऊ द्या, सुन बाहेरची असते का? आपण घरची लक्ष्मी म्हणून त्यांच्याकडे बघतो. ४० वर्ष झाली तरी बाहेरची...आयाबहिणींनो सांगा. या सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे. तुम्ही मला ३०-३५ वर्ष खूप प्रेम दिलंय. तसेच प्रेम द्या असं आवाहन अजित पवारांनी केले. 

दरम्यान, लोकसभेलाही मतदान करा, केंद्राचा निधी आणायचा आहे. ते आणल्याशिवाय कायमचे पाण्याचे दुखणं सुटणार नाही. हे लक्षात घ्या. कुठल्या बुथवर काय झाले सर्व कळते. लोकसभेत जे सरकार येणार आहे त्या विचारांचा खासदार निवडून दिल्यानंतर आपल्याला मतदारसंघातील कामे करायची आहेत. काहीजण म्हणाले खासदाराची पर्स कोण सांभाळणार, पर्स तीच सांभाळणार, मी काम करून आणेन. मागच्या अनेक खासदारांपेक्षा महायुतीच्या खासदाराची कारकिर्द उजवी असेल असा विश्वास तुम्हाला देतो असं अजित पवारांनी सांगितले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारbaramati-pcबारामतीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Lok Sabha 2019 Exit Pollलोकसभा निवडणूक एक्झिट पोल