शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

होय, उदयनराजेंचा फोन साधाच आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2019 14:36 IST

सोशल मीडियावर एवढे फॉलोवर्स असणारे उदयनराजे मात्र स्वत: साधाच मोबाईल वापरतात.

मुंबई - साताऱ्याचे विद्यमान खासदार छत्रपती उदयनराजे भोसले कॉलर उडविण्याच्या स्टाईलमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. एवढच नाही, तर सोशल मीडियावर उदयनराजे यांचे लाखो फॉलोवर्स आहेत. त्यांच्या एका पोस्टला हजारोने लाईक्स आणि कमेंट मिळत असतात. सोशल मीडियावर एवढे फॉलोवर्स असणारे उदयनराजे मात्र स्वत: साधाच मोबाईल वापरतात.

अनेक राजकीय नेत्यांकडे लाखो रुपये किंमतीचे मोबाईल पहायला मिळतात. तसेच हे नेते मोबाईलवरूनच सोशल मीडियावर वैयक्तीकरित्य सक्रीय दिसून येतात. याउलट उदयनराजे साधा मोबाईल वापरतात. यातून ते आपला साधेपणा जपताना दिसतात. जनतेत गेल्यावर जनतेचे होऊन जाणारे उदयनराजे कधीही मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचे दिसत नाहीत.

उदयनराजे यांच्या बिनधास्त स्टाईलचे लाखो चाहते आहेत. त्यातच त्यांची कॉलर उडविण्याची पोस्ट असेल तर मग झालच. त्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा अक्षरश: पाऊस पडतो. सातारा लोकसभा मतदार संघातून विजयाची हॅटट्रिक करण्यासाठी सज्ज असलेले उदयनराजे सोशल मीडियावर एक्टीव्ह असले तरी स्वत: मोबाईलवरून उदयनराजे सोशल मीडियावर व्यस्त असल्याचे दिसत नाही. तरी देखील त्यांची फॅन फॉलोविंग इतर नेत्यांपेक्षा अधिकच आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी देखील जाहीर सभेत उदयनराजे यांची कॉलर उडविली होती. त्यावेळी सभेत एकच हशा पिकला होता. उदयनराजे यांची ही स्टाईल तरुणाईला भुरळ घालत घालते. ज्याप्रमाणे उदयनराजे यांचा सातारमध्ये दरारा आहे, तोच दरारा त्यांचा सोशल मीडियावर देखील असल्याचे स्पष्ट दिसते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेNCPराष्ट्रवादी काँग्रेस