शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरेंना सर्वाधिक टीआरपी, शेलारांनीच दिली आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 15:18 IST

राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा एकाचवेळी सुरु असतांना इलेक्ट्रॉनिक मीडियावर राज यांना प्राधान्य दिले जात असल्याचे अनेकवेळा पहायला मिळाले.

मुंबई - राज ठाकरेंच्या भाषणाला  वृत्तवाहिन्यांवर किती टीआरपी मिळतो याची आकडेवारीच भाजपच्या आशिष शेलार यांनी भर सभेत दाखवली. शेलारांनी दाखवलेल्या आकडेवारी वरून भाजपला काय साध्य करायचे आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे . राज ठाकरेंनी महाराष्ट्रभर घेतलेल्या सभेत  भाजपवर केलेल्या आरोपाला  उत्तर देतांना शेलार बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप विरोधात राज ठाकरे यांनी ६ एप्रिल ते २६ एप्रिलपर्यंत महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेतल्या. २० दिवसांच्या काळात इलेक्ट्रॉनिक मीडियाने राज यांना २,६०० मिनिटं टीव्हीवर दाखवले. दिवसातून राज ठाकरे १३० मिनिटे झळकायचे तर प्रत्येक तासातील २५ मिनटातून ५ मिनटे राज यांचे दर्शन टीव्हीवर घडत होते, असे शेलार यांनी सांगितले.

राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा एकाचवेळी सुरु असताना इलेक्ट्रॉनिक मीडियावर राज यांना प्राधान्य दिले जात असल्याचे अनेकवेळा पहायला मिळाले. राज ठाकरेंना इलेक्ट्रॉनिक मीडियावर किती प्रतिसाद मिळतो याची आकडेवारी  शेलार यांनी मांडल्याने शेवटी भाजप पेक्षा राज यांचीच क्रेझ जास्त आहे हे पुन्हा सिद्ध झाले आहे. 

राज ठाकरेंच्या सभेला जमणारी गर्दी आणि त्यांना मिळणारा मोठा प्रतिसाद भाजपसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यातच राज यांना माध्यमात मोठी पसंती मिळत आहे याची आकडेवारीच भाजपच्या आशिष शेलारांनी मांडल्याने राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय ठरत आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRaj Thackerayराज ठाकरेAshish Shelarआशीष शेलारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस