शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Video: झोपा काढू नका, उठा अन् मतदान करा; बाळासाहेब ठाकरेंचा 'आवाssज'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2019 11:18 IST

मुंबई आणि महाराष्ट्रातल्या बांधवांना, भगिनींना आवाहन

मुंबई: शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरेंचा आवाज महाराष्ट्रालाच नव्हे, तर संपूर्ण देशाला परिचयाचा आहे. ठाकरी शैलीतली त्यांची गर्जना कित्येक दशकं देशात गाजली. आज मुंबई, ठाण्यासह राज्यातल्या 17 लोकसभा मतदारसंघात मतदान सुरू असताना पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरेंचा आवाज ऐकू आला. झोपा काढू नका, उठा अन् मतदान करा, असा मतदारांना खडबडून जागं करणारा आवाज सोशल मीडियावर ऐकू येत आहे. आवाजाचे जादूगार चेतन शशीतल यांनी बाळासाहेबांच्या आवाजात सर्वसामान्यांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. बाळासाहेबांनी दिलेली प्रत्येक सूचना शिवसैनिकांनी आदेश मानली. शिवसैनिकांसोबतच कोट्यवधी मराठी माणसांच्या मनात बाळासाहेबांना आदराचं स्थान आहे. त्यामुळेच डबिंग आर्टिस्ट चेतन शशीतल यांनी बाळासाहेबांच्या आवाजात मुंबईकरांना आणि महाराष्ट्रातील जनतेला मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. 'मुंबईकर आणि महाराष्ट्रातले माझे सर्व बांधव, भगिनींनो.. घरी बसून झोपा काढू नका, उठा आणि मतदान करा.. आपल्या देशाचं भवितव्य तुमच्या हातात आहे..', असं आवाहन शशीतल यांनी केलं आहे.25 जानेवारीला प्रदर्शित झालेल्या 'ठाकरे' चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकींनी बाळासाहेबांची भूमिका साकारली होती. मराठीत अभिनेते सचिन खेडेकर यांनी बाळासाहेबांच्या व्यक्तीरेखेला आवाज दिला होता. मात्र त्याबद्दल सोशल मीडियावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. खेडेकर यांच्याऐवजी चेतन शशीतल यांचा आवाज वापरला जावा, असा सूर सोशल मीडियावर व्यक्त झाला. त्याआधी बाळकडू चित्रपटात चेतन यांनी बाळासाहेबांचा आवाज दिला होता. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Balasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेVotingमतदान