शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाकडून शिवसेनेला 25-23चा प्रस्ताव; भिवंडी किंवा पालघर सोडण्यास तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 13:05 IST

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं 26, तर शिवसेनेनं 22 जागा लढवल्या होत्या.

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपामध्ये युतीची चर्चा सुरू आहे. भाजपानं शिवसेनेसाठी अधिकची जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं 26, तर शिवसेनेनं 22 जागा लढवल्या होत्या. मात्र आता भाजपानं आपल्या कोट्यातील एक जागा शिवसेनेला सोडण्याची तयारी दर्शवली आहे. भाजपामधील सूत्रांनी ही माहिती दिली आहे. मात्र यावर अद्याप शिवसेनेनं प्रतिक्रिया दिलेली नाही. यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपानं 25-23 चा फॉर्म्युला तयार केला आहे. भिवंडी किंवा पालघरची जागा शिवसेनेला सोडण्याबद्दल चर्चा सुरू आहे. सध्या या दोन्ही जागांवर भाजपाचे खासदार आहेत. चिंतामण वनगा यांच्या निधनानं रिक्त झालेल्या पालघरमध्ये गेल्या वर्षी पोटनिवडणूक झाली. त्यात त्यांचे पुत्र श्रीनिवास वनगा पराभूत झाले. मात्र त्यांनी भाजपाचे उमेदवार राजेंद्र गावित यांना चांगली टक्कर देत जवळपास अडीच लाख मतं मिळवली. त्यामुळे ही जागा शिवसेनेसाठी सोडली जाऊ शकते. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेनेत 26-22 असा फॉर्म्युला होता. त्यावेळी भाजपानं स्वत:च्या कोट्यातील दोन जागा मित्रपक्षांसाठी सोडल्या होत्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी हातकणंगलेमधून निवडणूक लढवली होती. त्यात ते विजयी झाले होते. तर महादेव जानकर बारामतीमधून निवडणुकीच्या आखाड्यात उतरले होते. ते राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळेंकडून पराभूत झाले. मात्र त्यांनी सुळे यांनी कडवी लढत दिली होती. दोन जागा मित्रपक्षांसाठी सोडणाऱ्या भाजपानं 2014 मध्ये 24 जागा लढवल्या. त्यातील 23 जागा त्यांनी जिंकल्या. तर शिवसेनेनं 22 जागा लढवत 18 जागांवर यश मिळवलं. 

टॅग्स :BJPभाजपाShiv SenaशिवसेनाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९bhiwandiभिवंडीpalgharपालघर