शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

एकेकाळचे खंदे सहकारी, आता कट्टर विरोधक; २५ टक्के मतदारसंघात शिवसैनिक आमनेसामने

By यदू जोशी | Updated: April 22, 2024 08:27 IST

Loksabha Election - राज्यातील २५ टक्के मतदारसंघांत शिवसैनिकांमध्येच रंगतोय सामना; कोण मारणार बाजी याकडे नजरा 

मुंबई : खांद्याला खांदा लावून ज्यांनी एकसंध शिवसेनेत अनेक वर्षे सोबत काम केले, असे शिवसैनिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांविरुद्ध दंड थोपटून उभे असल्याचे चित्र किमान १२ लोकसभा मतदारसंघांमध्ये दिसत आहे. राज्यात ४८ लोकसभा मतदारसंघ आहेत. याचा अर्थ, २५ टक्के मतदारसंघांमध्ये शिवसैनिकच एकमेकांना आव्हान देत आहेत. 

केंद्रीय मंत्री नारायण राणे अनेक वर्षे शिवसेनेत होते. नंतर काँग्रेसमध्ये गेले आणि नंतर भाजपमध्ये स्थिरावले. यवतमाळ-वाशिममधील संजय देशमुख हे काँग्रेस, अपक्ष, भाजप आणि आता उद्धवसेना असा प्रवास केलेले आहेत. त्यांच्या प्रतिस्पर्धी शिंदेसेनेच्या राजश्री पाटील एकत्रित शिवसेनेकडून नांदेडमध्ये विधानसभा निवडणूक लढल्या होत्या. बुलढाणा मतदारसंघातील प्रतापराव जाधव आणि नरेंद्र खेडेकर हे जुने शिवसैनिक दोन वेगवेगळ्या गटांकडून एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. हातकणंगलेत शिंदेसेनेचे धैर्यशील माने विरुद्ध सत्यजीत पाटील असा मुकाबला आहे. सत्यजीत हे एकदा शिवसेनेचे तर एकदा काँग्रेसचे आमदार राहिलेले आहेत.

लढत राष्ट्रवादीच्या दोन गटांत, पण...  शिरुर हा एकमेव असा मतदारसंघ आहे, जिथे शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट अशी लढत होत असली, तरी तेथील दोन्ही प्रतिस्पर्धी हे शिवसेनेत राहिलेले आहेत.  डॉ.अमोल कोल्हे (शरद पवार गट) विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील (अजित पवार गट) हे दोघेही जुने शिवसैनिक आहेत. 

कुठे कशा आहेत लढती?‘मातोश्री’चे निकटवर्ती अनिल देसाई हे मुंबई दक्षिण-मध्य मतदारसंघात उद्धवसेनेकडून लढत आहेत. त्यांचा सामना ‘मातोश्री’शी अनेक वर्षे घनिष्ठ संबंध असलेले शिंदेसेनेचे खा.राहुल शेवाळे यांच्याशी होत आहे. नाशिकमध्ये उद्धवसेनेने माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली आहे. ही जागा महायुतीत शिंदेसेनेला मिळाली, तर तेथेही दोन शिवसैनिकांमध्येच लढाई होईल. 

ठाणे मतदारसंघातही हेच चित्र दिसण्याची शक्यता आहे. उद्धवसेनेने तेथे खा.राजन विचारेंना संधी दिली आहे. हा मतदारसंघ शिंदेसेनेकडे गेल्यास तिथेही शिवसैनिकांमध्येच लढत होईल.  मराठवाड्यातील शिवसेनेचा गड राहिलेल्या औरंगाबादमध्ये देखील दोन शिवसैनिकच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने उभे ठाकले आहेत.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४