लोणार येथील ऐतिहासिक धारातीर्थला फुटला पाझर
By Admin | Updated: July 13, 2016 19:36 IST2016-07-13T17:08:39+5:302016-07-13T19:36:20+5:30
जागतिक पर्यटनस्थळ असलेल्या लोणार सरोवरालगत धारातीर्थ म्हणून एक पाण्याची धार आहे.

लोणार येथील ऐतिहासिक धारातीर्थला फुटला पाझर
ऑनलाइन लोकमत
बुलढाणा, दि. 13 - जागतिक पर्यटनस्थळ असलेल्या लोणार सरोवरालगत धारातीर्थ म्हणून एक पाण्याची धार आहे. बाराव्या शतकापासून असलेल्या या धारातीर्थचे पाणी साठ वर्षांनंतर यावर्षी उन्हाळ्यात पहिल्यांदाच आटले होते. गत दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे धारातीर्थला पुन्हा पाझर फुटला आहे. लोणार येथील खाऱ्या पाण्याच्या सरोवरालगत दोन ठिकाणी बाराही महिने चोवीस तास पाणी पडत असलेली धार आहे. यापैकी एका धारेला विशेष महत्व असून, या ठिकाणी अनेक भाविक स्नानाकरिता येतात. बाराव्या शतकात देवगिरीचे राजा रामदेवराय यांच्यापासून तर आतापर्यंत अनेक राजे महाराजे या ठिकाणी स्नान करण्यासाठी यायचे. या ठिकाणी स्नान करण्याला विशेष महत्व आहे. ही धार बाराही महिने चोवीस तास सुरू असते. मात्र गत तीन वर्षांपासून वऱ्हाडात अल्प प्रमाणात पाऊस झाल्यामुळे यावर्षी उन्हाळ्यात सदर धारीचे पाणी आटले होते. तब्बल साठ वर्षांनंतर सदर धारीचे पाणी आटल्याने नागरिक सांगतात. गत दोन दिवसात झालेल्या पावसानंतर मात्र आता पुन्हा धारीला पाणी आले आहे.