शिक्षकांच्या मागणीसाठी पहिल्याच दिवशी ठोकले शाळेला कुलूप!

By Admin | Updated: June 27, 2016 20:52 IST2016-06-27T20:52:02+5:302016-06-27T20:52:02+5:30

वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात असलेल्या रुईगोस्ता येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते सातवीसाठी केवळ तीनच शिक्षक कार्यरत आहेत. तथापि, रिक्त असलेल्या

Locked on the first day for the teacher's demand! | शिक्षकांच्या मागणीसाठी पहिल्याच दिवशी ठोकले शाळेला कुलूप!

शिक्षकांच्या मागणीसाठी पहिल्याच दिवशी ठोकले शाळेला कुलूप!

>ऑनलाइन लोकमत
कारपा, दि. २७ - वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात असलेल्या रुईगोस्ता येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते सातवीसाठी केवळ तीनच शिक्षक  कार्यरत आहेत. तथापि, रिक्त असलेल्या शिक्षकांची पदे भरण्याची मागणी वारंवार करूनही त्याकडे शिक्षण विभागाने दुर्लक्ष केले. दरम्यान, शाळा व्यवस्थापन समितीसह गावक-यांनी पहिल्याच दिवशी सोमवार, २७ जून रोजी शाळेला कुलूप ठोकून शिक्षण विभागाप्रती आपला रोष व्यक्त केला. 

Web Title: Locked on the first day for the teacher's demand!