देहली प्रकल्प कार्यालयाला प्रकल्पबाधितांनी ठोकले कुलूप
By Admin | Updated: August 24, 2016 20:07 IST2016-08-24T20:07:28+5:302016-08-24T20:07:28+5:30
देहली प्रकल्पबाधीत आपल्या विविध मागण्या मांडण्यासाठी प्रकल्पाच्या कार्यालयात ेगेले असता जबाबदार अधिकारीच नसल्यामुळे संतप्त प्रकल्पबाधितांनी कार्यालयालाच टाळे ठोकल्याची घटना

देहली प्रकल्प कार्यालयाला प्रकल्पबाधितांनी ठोकले कुलूप
ऑननलाइन लोकमत
नंदुरबार, दि. 24 : देहली प्रकल्पबाधीत आपल्या विविध मागण्या मांडण्यासाठी प्रकल्पाच्या कार्यालयात ेगेले असता जबाबदार अधिकारीच नसल्यामुळे संतप्त प्रकल्पबाधितांनी कार्यालयालाच टाळे ठोकल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. अक्कलकुवा तहसीलदारांकडे चाव्या जमा करण्यात आल्या.
देहली प्रकल्पाचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबीत आहे. प्रकल्पबाधीतांच्या मागण्यांबाबत शासन व जलसंपदा विभाग दुर्लक्ष करीत आहे. या प्रकल्पाचा शासनाने नुकताच सुधारीत आराखडा जाहीर केला आहे. त्यामुळे प्रकल्पबाधीत थेट जलसंपदा विभागाच्या देहली प्रकल्प उपविभागात दाखल झाले.
तेथे त्यांनी संबधित अधिकाऱ्यांना आपल्या मागण्या ऐकविण्याचा प्रयत्न केला. परंतू कार्यालयात दुपारी १२ वाजता जबाबदार अधिकारीच उपस्थित नव्हते. १६ अधिकारी, कर्मचाऱ्यांपैकी केवळ एक अधिकारी आणि पाच कर्मचारी उपस्थित होते. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रकल्प बाधितांनी आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कार्यालयालाच कुलूप ठोकले. त्याच्या चाव्या थेट तहसीलदारांकडे जमा करण्यात आल्या.