मध्य रेल्वेला ‘लोकल’टेन्शन

By Admin | Updated: December 26, 2014 04:24 IST2014-12-26T04:24:29+5:302014-12-26T04:24:29+5:30

मध्य रेल्वेकडून नुकतीच सीएसटी ते ठाणे दरम्यान डीसी (१,५00 डायरेक्ट करंट) ते एसी (२५000 अल्टरनेट करंट) परावर्तनाची चाचणी घेण्यात आली.

Local train to Central Railway | मध्य रेल्वेला ‘लोकल’टेन्शन

मध्य रेल्वेला ‘लोकल’टेन्शन

मुंबई : मध्य रेल्वेकडून नुकतीच सीएसटी ते ठाणे दरम्यान डीसी (१,५00 डायरेक्ट करंट) ते एसी (२५000 अल्टरनेट करंट) परावर्तनाची चाचणी घेण्यात आली.
ही चाचणी यशस्वी झाल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. मात्र
तिला अद्याप रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून मंजुरी मिळालेली
नाही. त्यामुळे सीएसटी ते ठाणे
डीसी परावर्तनावरच लोकल चालणार आहे. परंतु सध्या डीसीवर असलेल्या लोकल कमी असल्याने आणखी
नऊ डीसी लोकलची गरज मध्य रेल्वेला आहे.
मध्य रेल्वेमार्गावर ठाणे आणि त्यापुढे डाऊनला डीसी-एसी परावर्तनाचे काम पूर्ण झाले आहे. सीएसटी ते ठाणे डीसी-एसी परावर्तनाचेही नोव्हेंबर महिन्यात काम पूर्ण केल्यावर त्याची चाचणी नुकतीच शनिवारी रात्री करण्यात आली. रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून मंजुरी मिळाल्यास लोकलचा वेग वाढेल आणि रेल्वेची वीज बचत होण्याबरोबरच नवीन लोकल येण्याचा मार्गही मोकळा होईल.
मात्र रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून मंजुरी बाकी असल्याने सध्या ठाणे
ते सीएसटीपर्यंत डीसी-एसी परार्वनाच्या लोकल धावत आहेत आणि आणखी नऊ डीसी-एसी लोकलची मध्य रेल्वेला गरज आहे. सध्या मध्य रेल्वेकडे १२१ लोकल असून यामध्ये हार्बरवर ३६, ट्रान्स हार्बरवर १५ आणि उर्वरित मेन लाइनवर धावत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Local train to Central Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.