‘गुन्ह्यां’चा लोकलच्या वेळापत्रकाला फटका
By Admin | Updated: July 8, 2016 01:38 IST2016-07-08T01:38:08+5:302016-07-08T01:38:08+5:30
मुंबई उपनगरीय लोकलचे वेळापत्रक तांत्रिक बिघाडांनी जरी विस्कळीत होत असले तरी त्याला काही वेळा रेल्वे हद्दीतील ‘गुन्हे’देखील कारणीभूत ठरतात. रेल्वे हद्दीत होणाऱ्या अनेक

‘गुन्ह्यां’चा लोकलच्या वेळापत्रकाला फटका
मुंबई : मुंबई उपनगरीय लोकलचे वेळापत्रक तांत्रिक बिघाडांनी जरी विस्कळीत होत असले तरी त्याला काही वेळा रेल्वे हद्दीतील ‘गुन्हे’देखील कारणीभूत ठरतात. रेल्वे हद्दीत होणाऱ्या अनेक छोट्या-मोठ्या गुन्ह्यांमुळे पश्चिम रेल्वेवरील लोकलचे वेळापत्रकच तीन महिन्यांत बिघडले असल्याची बाब समोर आली आहे. विविध गुन्ह्यांमुळे एप्रिल ते जून या तीन महिन्यांत १00 लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत. मागील वर्षाशी तुलना केल्यास त्याचे प्रमाण कमी झाले असून, रेल्वे सुरक्षा दलाने दाखविलेल्या तत्परतेमुळेच ही किमया साधण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकलचा पसारा हा चर्चगेट ते डहाणूपर्यंत आहे. या मार्गावरून दररोज १,३00पेक्षा जास्त लोकल फेऱ्या होतात आणि ४0 लाखांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. मात्र या प्रवाशांना सातत्याने लोकल विस्कळीत होण्याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या विस्कळीत होण्याला रेल्वे हद्दीतील गुन्हे हे प्रमुख कारण ठरत आहे. रेल्वे हद्दीत अनेक गुन्हे घडत असून, त्यातील काही गुन्ह्यांमुळे तर लोकलचे वेळापत्रक पुरते बिघडत आहे. प्रवाशांकडून लोकल किंवा मेल-एक्स्प्रेसमधील चेन ओढणे, ट्रेनमध्ये प्रवाशांमधील वाद, सिग्नल यंत्रणेशी निगडित असलेली बॅटरी किंवा केबल चोरी इत्यादी गुन्ह्यांचा समावेश वेळापत्रक विस्कळीत होण्यास कारणीभूत ठरत आहे. २0१६मधील एप्रिल ते जून या तीन महिन्यांत ५४ केसेसची नोंद झाली आहे. यामुळे १00 फेऱ्या रद्द करतानाच जवळपास ४७८ लोकल फेऱ्यांना लेटमार्क लागला आहे. वर्ष २0१५च्या एप्रिल ते जून या तीन महिन्यांशी तुलना केल्यास आता रेल्वे हद्दीतील गुन्ह्यांचे आणि लोकलचे वेळापत्रक विस्कळीत होण्याचे प्रमाण बरेचसे कमी झाले आहे. २0१५मध्ये ८१ घटनांची नोंद झाली असून, त्यामुळे ११६ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. तर तब्बल ८२३ फेऱ्यांना उशीर झाला होता. त्यामुळे आता ४२
टक्के वक्तशीरपणात सुधारणा झाली आहे. (प्रतिनिधी)
मागील वर्षातील एकट्या जून महिन्यात २४ केसेस दाखल झाल्या होत्या. तर त्यामुळे ५६ फेऱ्या रद्द करतानाच ३१९ फेऱ्यांना लेटमार्क लागला होता.
2016
च्या जून महिन्यात फक्त
१६ घटनांची नोंद झाली आहे. त्यामुळे ७७ फेऱ्या रद्द होतानाच २११ फेऱ्यांना लेटमार्क लागला आहे.
रेल्वे सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले असून, लोकलच्या वक्तशीरपणातही सुधारणा झाली आहे. यापेक्षाही जास्त सुधारणा वेळापत्रकात होईल, याची खबरदारी आम्ही घेऊ.
- आनंद झा (प.रे. सुरक्षा दल-वरिष्ठ सुरक्षा आयुक्त)