स्थानिक स्वराज्य संस्था चिन्हावरच
By Admin | Updated: June 29, 2016 05:02 IST2016-06-29T05:02:31+5:302016-06-29T05:02:31+5:30
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

स्थानिक स्वराज्य संस्था चिन्हावरच
मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
आगामी काळातील पक्षाची रणनिती ठरविण्यासाठी राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी बैठक झाली. या बैठकीस जिल्हा निरिक्षकांसह प्रदेश कार्यकारणी, आमदार, सर्व सेलचे प्रमुख आदी उपस्थित होते.
स्थानिक पातळीवर ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी समविचारी धर्मनिरपेक्ष पक्षांबरोबरही आघाडी करण्याचा निर्णय पक्षाने खुला ठेवला आहे. या निवडणुकांत जास्तीत जास्त तरूणांना संधी देण्याचा ही पक्षाने व्यापक विचार केला आहे. त्याच बरोबर संघटनेच्या कामाला गती देण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून सभा, शिबीरांचे आयोजन केले जाणार आहे असेही तटकरे यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)