शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल, उद्धव ठाकरे  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2019 20:11 IST

राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती.

नागपूर -  राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसेच कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम ही थेट त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळाचे अधिवेशन आटोपल्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. हिवाळी अधिवेशन आटोपल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये कर्जमाफीबाबत माहिती देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ''शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम ही थेट त्यांच्या बँकेत जमा होईल.  मागच्या सरकारनेही कर्जमाफीची योजना जाहीर केली होती. पण त्यात वारंवार सुधारणा केल्यामुळे ही योजना शेतकऱ्यांपर्यंत योग्य पद्धतीने पोहोचली नव्हती.'' दरम्यान राज्यातील महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावरून एक कठोर कायदा करण्याचे संकेतही मुख्यमंत्र्यांनी दिले. ''राज्यात स्त्रियांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आंध्र प्रदेशच्या धर्तीवर लवकरच कायदा करण्याचे विचाराधीन आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.  त्याबरोबरच प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक मुख्यमंत्री कार्यालय सुरू केले जाणार आहे.  जेणेकरून त्या त्या जिल्ह्यातील लोकांना त्यांच्या शासकीय कामासाठी मुंबईला हेलपाटे मारावे लागू नयेत असे एक सीएमो कार्यालय प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी लवकरच सुरू होणार आहे ही सगळी कार्यालय मंत्रालयाच्या कार्यालयाशी निगडीत असतील, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.  विदर्भाच्या विकासासाठी भरीव काम करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. ''पूर्व विदर्भातील खनिज साठा हा आजपर्यंत दुर्लक्षित राहिला.  त्यासाठी पूर्व विदर्भात दिल भिलाई स्टील प्लँटच्या धर्तीवर पूर्व विदर्भात एक स्टील प्लँट उभारण्याचा मानस सरकारचा असल्याचे उद्धव ठाकरेंनी सांगितले.   

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार