शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

महाजेनकोची अनेक युनिट्स बंद; यंदाच्या उन्हाळ्यात राज्याला ‘लोडशेडिंग’चे चटके?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 2:57 AM

महाजेनकोचे अनेक युनिट बंद; क्षमता १०१७० तर उत्पादन ७४१६

नागपूर : राज्याची वीज उत्पादक कंपनी महाजेनकोतर्फे नागरिकांसाठी धोक्याची घंटा वाजली आहे. १०१७० मेगावॅट वीज उत्पादन क्षमता असलेल्या विद्युत केंद्रात सध्या केवळ ७४१६ मेगावॅट विजेचे उत्पादन होत आहे. दुसरीकडे फेब्रुवारीत विजेची मागणी सातत्याने २१ हजार मेगावॅटच्या स्तरापर्यंत पोहचत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात नागरिकांना वीज संकटाचा सामना करावा लागेल, अशी स्थिती दिसून येत आहे.गत बुधवारी राज्यात विजेची मागणी थेट २१५७० मेगावॅटच्या विक्रमी स्तरावर पोहचली. यापूर्वी २३ ऑक्टोबर २०१८ ला २०७४५ मेगावॅट मागणीचा रेकार्ड नोंदविण्यात आला होता. फेब्रुवारीमध्ये नोंदविलेल्या मागणीचा विचार करता यावर्षी ३३२० मेगावॅटपेक्षा अधिक मागणी राहिली, जी १८ टक्के अधिक आहे. शनिवारी दुपारी १२ वाजता २१,३९२ मेगावॅटची मागणी नोंदविण्यात आली. महावितरणने केंद्रासह खासगी संयंत्राच्या भरवशावर ही वाढलेली मागणी पूर्ण करून स्वत:ची पाठ थोपाटून घेतली असली तरी उन्हाळ्यात विजेची मागणी २५ हजार मेगावॅटच्यावर गेल्यास राज्यात भारनियमन लागू करण्याशिवाय पर्याय उरणार नाही.एनटीपीसी आणि एनपीसीआयएल यांच्याकडून ४१३४ मेगावॅट वीज घेण्यात आली आहे. याशिवाय अदानी पॉवर, रतन इंडिया, सीजीपीएल, जेएसडब्ल्यू, एम्को आदी खासगी कंपन्यांकडून ४५६७ मेगावॅट वीज घेतल्याने राज्यात भारनियमनाची गरज पडली नाही. मात्र वाढत्या मागणीने महावितरणचे अधिकारी चिंतेत पडल्याची माहिती सूत्रांनी दिली.दुसरीकडे महाजेनकोच्या अनेक केंद्रावर संकट निर्माण झाले आहे. उत्पादन खर्च वाढल्याने त्यांना बंद ठेवण्यात आले आहे. यामध्ये भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राच्या युनिट ३ सह नाशिक व परळी येथील युनिटचा समावेश आहे. चंद्रपूरची युनिट क्रमांक ५ आणि ६ आधीच बंद आहेत आणि कोराडीच्या युनिट क्रमांक ६ आणि ७ ची स्थितीसुद्धा सारखीच आहे. अशा परिस्थितीत मागणी पूर्ण करण्यासाठी महावितरणला खासगी संयंत्राचा आधार घ्यावा लागत आहे.बंद युनिट सुरू करणार, कोयना सोलरचा आधारमहावितरणकडून मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीतर्फे लोड मॅनेजमेंटच्या माध्यमातून उन्हाळ््यातील वाढती मागणी पूर्ण करण्याचे प्रयत्न केले जातील. यासाठी महाजेनकोचे बंद पडलेले युनिट सुरू करण्यास सांगण्यात आले आहे. रतन इंडियाच्या बंद पडलेल्या १०८० मेगावॅटचे संयंत्र सुरू करण्यात येईल. कोयना धरणात मुबलक पाणी असल्याने तेथे जल विद्युतचे उत्पादन वाढवून संकटाचा सामना करण्यात येईल.

टॅग्स :electricityवीज