एकाच डॉक्टरवर भार

By Admin | Updated: May 30, 2016 02:38 IST2016-05-30T02:38:51+5:302016-05-30T02:38:51+5:30

गेल्या काही महिन्यांपूवीॅ बदली झाल्याने हे पद रिक्त असून येथे डॉ. प्रदीप जाधव हे एकमेव डॉक्टर कार्यरत आहेत

Loads on the same doctor | एकाच डॉक्टरवर भार

एकाच डॉक्टरवर भार

वसंत भोईर,

वाडा : वाडा ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांची गेल्या काही महिन्यांपूवीॅ बदली झाल्याने हे पद रिक्त असून येथे डॉ. प्रदीप जाधव हे एकमेव डॉक्टर कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांना रात्रंदिवस येथे काम करावे लागत आहे. रूग्णालयात एकच डॉक्टर असल्याने रूग्णांचे प्रचंड हाल होत आहेत.
वाडा हे जिल्हयाच्या ग्रामीण भागातील मध्यवर्ती ठिकाण आहे. विक्र मगड, मोखाडा तालुक्यातील सूर्यमाळ, शहापूर तालुक्यातील अघई आणि भिवंडी तालुक्यातील अंबाडी व गणेशपुरी या परिसरातील रूग्ण येथे उपचारासाठी येतात. या रूग्णालयात पुरूष आणि महिलांसाठी प्रत्येकी एक कक्ष आहे.
येथे दररोज ३०० ते ३५० च्या आसपास बाह्यÞरु ग्ण तर ४० ते ५० च्या आसपास आंतररु ग्ण तपासणी साठी येत असतात. तर महिन्याकाठी ८० ते ९० प्रसूती होतात. मात्र येथे स्त्री रोग तज्ज्ञ व भूलतज्ज्ञ नाहीत. त्यामुळे गुंतागुंतीच्या प्रसूतीसाठी महिलांना ठाणे व मुंबई येथील सरकारी रूग्णालयात पाठवावे लागते. त्यामुळे रूग्णांचे हाल होतात.
त्याचबरोबर साथीच्या आजाराचेही रूग्ण येत असल्याने त्यांचा अतिरिक्त भार पडत आहे. सर्पदंश, विंचू दंश, गॅस्ट्रो यासारख्या रूग्णांचीही संख्या मोठी आहे. तसेच महामार्गावर अपघात नेहमी होत असल्याने अपघातग्रस्तांनाही उपचारासाठी या रूग्णालयात आणले जाते. परंतु पुरेसे डॉक्टर व सोई सुविधा नसल्याने रूग्णांचे हाल होत आहेत.
>रूग्णालयातील अपुऱ्या जागेमुळे विशेषत: पावसाळ्यात रूग्णांवर व्हरांड्यात उपचार करावे लागतात. त्यात भर म्हणून वैद्यकीय अधिकारी एकच असल्याने रूग्णांची प्रचंड हेळसांड होते आहे.
>रूग्णालयात एक वैद्यकीय अधीक्षक, भूलतज्ज्ञ,स्त्री रोग तज्ज्ञ,एक वैद्यकीय अधिकारी अशी चार महत्वाची पदे रिक्त असल्याची माहिती प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रदीप जाधव यांनी दिली.
>रिक्त पदे तातडीने न भरल्यास वाडा ग्रामीण रु ग्णालयाला टाळे ठोकू असा गंभीर इशारा श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस विजय जाधव यांनी दिला आहे. त्यावर आरोग्य खात्याने मौन पाळणे पसंत केले आहे.

Web Title: Loads on the same doctor