लोंढे टोळीकडून परशाचा गेम
By Admin | Updated: June 21, 2014 23:18 IST2014-06-21T23:18:12+5:302014-06-21T23:18:12+5:30
‘गेम’ कुख्यात अप्पा लोंढे टोळीचा सक्रिय सदस्य असलेल्या बाळ्या ऊर्फ बाळासाहेब चौधरी (रा. बिबवेवाडी) याने त्याच्या 9 साथीदारांसह केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

लोंढे टोळीकडून परशाचा गेम
>पुणो : कुख्यात बाबा बोडके टोळीचा गुन्हेगार, तसेच गुन्हेगारीतून इस्टेट एजंट बनलेल्या परशा ऊर्फ आबा ऊर्फ परशुराम पांडुरंग जाधव (वय 39, रा. भारती विद्यापीठ परिसर) याचा ‘गेम’ कुख्यात अप्पा लोंढे टोळीचा सक्रिय सदस्य असलेल्या बाळ्या ऊर्फ बाळासाहेब चौधरी (रा. बिबवेवाडी) याने त्याच्या 9 साथीदारांसह केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. हा खून जमिनीच्या वादातून झाला असण्याची शक्यता पोलीस वर्तवीत असून, भारती विद्यापीठ पोलिसांनी चौकशीसाठी काही जणांना ताब्यात घेतले आहे.
याप्रकरणी संजय निवृत्ती मोरे (वय 43, रा. धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी चौधरी आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. परशाची धनकवडीतील तीन हत्ती चौकामध्ये आर्या इस्टेट एजन्सी आहे. तेथे मोरे हे ऑफिसबॉय म्हणून काम करतात. शुक्रवारी संध्याकाळी मोरे यांना परशाने घरी बोलावून घेतले होते. बाबुलाल मोहोळ आणि बाळा नावाच्या व्यक्तीसोबत बैठक असल्याचे त्याने सांगितले होते. परशाचा ड्रायव्हर लक्ष्मण चंद्रकांत रेड्डी आणि मोरे हे परशाला घेऊन सिध्देश हॉटेलमध्ये गेले. तेथून बाबुलाल, हेमंत यादव आणखी एका व्यक्तीला भेटून ते मोटारीतून अभिजित शिवानगेच्या सातारा रस्त्यावरील अथर्व प्लाझामधील पूना प्रॉपर्टीजच्या कार्यालयात गेले. तेथे चहा घेत असतानाच बाबुलालच्या मोबाईलवर बाळा चौधरीचा फोन आला. त्यानंतर परशा, ड्रायव्हर लक्ष्मण, बाबुलाल, हेमंत आणि आणखी एक व्यक्ती हे साडेपाचच्या सुमारास गुजर निंबाळकरवाडी येथे जागा पाहायला गेले. त्यांच्या मागे अभिजित आणि एक जण होता. निंबाळकरवाडीतील सरहद्द शाळेसमोरच्या ओढय़ाच्या पलीकडील जागेवर चौधरी थांबलेला होता. त्याच्यासोबत आणखी काही जण होते. जुने सर्व विसरून जमिनीचा नवीन व्यवहार करू, असे म्हणत चौधरीने परशाला जागा दाखवली. त्या वेळी चौधरीने परशाला ‘‘तू एकटाच कशाला फिरतोस, बॉडीगार्ड घेऊन फिरत जा, पाहिजेल तर मी लायसन्सवाले बॉडीगार्ड देतो, त्याचा खर्च मी मी बघतो,’’ असे म्हणत बाळ्याने मोठय़ाने शर्माच्या नावाने हाक मारली. त्यानंतर सफारी घातलेल्या शर्माने परशावर गोळी झाडली. त्यानंतर बाळ्याने परशावर गोळी झाडली. परशाभोवती कडे करून उभे राहिलेल्या आणखी तीन ते चार जणांनी बेछुट गोळीबार केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या परशाला बघून मोरे आणि बाबुलाल यांनी पळण्याचा प्रयत्न केला असताना बाळ्याने त्यांना धमकी देऊन थांबवले व मोबाईल घेऊन पळाले.
4बाळ्या हा बिबवेवाडी परिसरात एक मानवाधिकार संस्था चालवतो. तो कुख्यात अप्पा लोंढेच्या टोळीमध्ये सक्रिय होता. त्याच्यावर खुनाच्या गुन्ह्यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, गुन्हे शाखेने बाळ्याच्या एका गुंडाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. नव्यानेच जमीन खरेदी -विक्रीच्या धंद्यामध्ये उतरलेल्या परशाने गेल्या काही महिन्यांत जमिनीचे ताबे मारण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे काही बांधकाम व्यावसायिकांचे नुकसान झाल्याची चर्चा आहे.
4या प्रकरणात न्यायालयाने बजावलेल्या वॉरंटच्या तामिलीचा अहवाल वेळेत पाठविला नाही. तो पाठवणो आवश्यक होते. त्यामुळे न्यायालयाने नाराजी व्यक्त केल्याची माहिती समजली आहे. परंतु, न्यायालयाने कारणो दाखवा नोटीस बजावल्याची माहिती अद्यापर्पयत मिळालेली नाही. नोटीस मिळाल्यास न्यायालयाचा मान राखत कार्यवाही होईल.
- मनोज लोहिया, अधीक्षक, ग्रामीण पोलीस