Aamir Khan Interviews CM Devendra Fadnavis: मंगळवारी गेट वे ऑफ इंडिया येथे रंगलेल्या लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यामध्ये अभिनेता आमीर खान याने घेतलेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत ही या सोहळ्यातील मुख्य आकर्षण ठरली. या मुलाखतीमध्ये आमीर खानने विचारलेल्या प्रश्नांना देवेंद्र फडणवीस हे हजरजबाबीपणे उत्तरं देत होते. या मुलाखतीच्या अखेरीस आमीर खानने त्याच्या चित्रपटातील काही पात्रांची नावं घेत सध्याच्या राजकारणात ही पात्रं कुठल्या नेत्याच्या व्यक्तिमत्त्वाशी जुळतात, अशी विचारणा केली त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी नरेंद्र मोदी हे लगानमधील भूवन तर एकनाथ शिंदे हे दंगलमधील महावीरसिंह असल्याचे सांगितले.
यावेळी आमीर खान म्हणाला की, मी मुलाखतीच्या शेवटी काही पात्रांची नावं घेणार आहे. तेव्हा तुम्ही ते पात्र कुठल्या नेत्याच्या व्यक्तीमत्वासाठी योग्य आहे त्याचं नाव घ्या. यावर देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नांची उत्तरं देताना आपल्याला एक लाईफ लाईन मिळावी, पब्लिक ओपिनियन मिळावं आणि ५०-५० चा पर्यायही मिळावा, अशी विनंती केली, त्यावरून तिथे उपस्थित असलेल्यांमध्ये एकच हशा पिकला. त्यानंतर आमीर खानने चित्रपट आणि त्यामधील एकेका पात्राचं नाव घेण्यास सुरुवात केलं.
कयामत से कयामत चित्रपटातील राज या पात्रासाठी कुठल्या नेत्याचं व्यक्तिमत्व साजेसं आहे असं आमीरने विचारल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांचं नाव घेतलं. तर रंगिलामधील मुन्ना टपोरी हे पात्र कुणाशी मिळतं जुळतं आहे असं विचारल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी कुणाचंही नाव घेतलं नाही. तसेच मी तुम्हाला अशा नेत्यांची नावं खाजगीत सांगेन सर्वांसमोर नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
तर सरफरोशमधील एसीपी राठोडचं नाव आमीरने पुकारल्यावर प्रेक्षकांमधून देवेंद्र फडणवीस यांचंच नाव घेतलं गेलं. त्यावर आमीरने तुम्ही तुमचंही नाव घेऊ शकता असं सांगितलं. तेव्हा मी रँचोवर माझं नाव घेतलं असतं असं सांगत उपस्थितांमध्ये हशा पिकवला. तर लगानमधील भुवन हे पात्र कुणाशी मिळतं जुळतं आहे असं विचारल्यावर फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव घेतलं. तर रंग दे बसंतीमधील डीजेसाठी एकनाथ शिंदे यांचं नाव परफेक्ट असल्याचं सांगितलं. तसेच दंगलमधील महावीर फोगाट हे पात्रसुद्धा एकनाथ शिंदे यांच्याशी मिळतं जुळतं असल्याचं फडणवीस म्हणाले. तर गझनी या पात्रासाठी कोण योग्य आहे, याचं उत्तर एकनाथ शिंदे देतील, असं सांगत चेंडू शिंदेंच्या कोर्टात टोलावला. तर एकनाथ शिंदे यांनी आपण यांचं उत्तर खाजगीत देऊ असं उत्तर दिलं.
Web Summary : At LMOTY 2026, CM Fadnavis likened Modi to Lagaan's Bhuvan and Shinde to Dangal's Mahavir Singh during an interview with Aamir Khan. He humorously avoided naming a politician for 'Rangila's' Munna, promising a private answer.
Web Summary : LMOTY 2026 में, मुख्यमंत्री फडणवीस ने आमिर खान के साथ एक साक्षात्कार में मोदी को लगान के भुवन और शिंदे को दंगल के महावीर सिंह के रूप में बताया। उन्होंने मजाकिया अंदाज में 'रंगीला' के मुन्ना के लिए किसी नेता का नाम लेने से परहेज किया, और निजी तौर पर जवाब देने का वादा किया।