शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

राज ठाकरेंच्या सल्ल्याला अजित पवारांचं एका वाक्यात उत्तर; सगळेच हसायला लागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 15:28 IST

Lokmat Maharashtrian of the Year Awards 2023: गेल्या ५५-६० वर्षाच्या राजकीय जीवनात शरद पवारांनी काही प्रसंग पाहून भाकरी फिरवण्याचे काम केलंय असं अजित पवार म्हणाले.

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची खासदार अमोल कोल्हे आणि अमृता फडणवीस यांनी घेतलेली मुलाखत सध्या जोरदार गाजतेय. राजकीय वर्तुळात या मुलाखतीचे पडसाद पाहायला मिळत आहे. लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०२३ या सोहळ्यात ही महामुलाखत घेण्यात आली. त्यात अमृता फडणवीसांनी काही नेत्यांची नावे घेत तुम्ही त्यांना काय सल्ला द्याल असा प्रश्न राज ठाकरेंना विचारला. त्यात अजित पवारांचेही नाव होते. 

एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, अजित पवार यांना राज ठाकरेंनी काय सल्ले दिले; अमृतांनी देवेंद्रंबाबतही केली तक्रार

अजित पवार यांना काय सल्ला द्या, तेव्हा राज ठाकरे यांनी मला अजित पवारांबाबत पाच तारखेच्या सभेत सविस्तर बोलायचेय. बाहेर जेवढे लक्ष देतायत त्यापेक्षा जास्त काकांवर लक्ष ठेवा असा सल्ला राज यांनी दिला. त्यावर पत्रकारांनी अजित पवारांना प्रश्न केला. त्यावर अजित पवार एका वाक्यात उत्तर दिले तेव्हा उपस्थितांमध्ये हशा पिकला. अजित पवार म्हणाले की, राज ठाकरेंनी जसं त्यांच्या काकांकडे लक्ष ठेवले तसे मीदेखील माझ्या काकांकडे लक्ष ठेवेन असं प्रत्युत्तर अजितदादांनी दिले. 

प्रसंग पाहून शरद पवारांनी भाकरी फिरवलीगेल्या ५५-६० वर्षाच्या राजकीय जीवनात शरद पवारांनी काही प्रसंग पाहून भाकरी फिरवण्याचे काम केलंय, नवे लोक पुढे आलेत आहेत हे सगळ्यांनी पाहिलेय, आम्हाला संधी मिळाली आम्ही काम दाखवून दिले. नवीन कार्यकर्ते आले पाहिजेत. नवे चेहरे आले पाहिजेत. पक्षातील पदाधिकारी असतात त्यात नवे चेहरे आले पाहिजेत. नवनवीन लोक पुढे येत असतात. काहीजण वयस्कर झाल्यावर बाजूला जातात. या घटना घडत राहतात असं अजित पवारांनी सांगितले आहे.  

स्थानिकांशी चर्चा करून मार्ग काढाबारसू प्रकल्पाबाबत अजित पवारांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस विकासाच्या आड कधीही येणार नाही. विकास साधताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही. लोकांच्या मनातील समज, गैरसमज असतील ते निकाली निघाले पाहिजे. स्थानिकांचे प्रश्न संवादाने सोडवायला हवे. सर्वेक्षण थांबवावे असं आवाहन आम्ही केले. स्थानिकांशी चर्चा करा. समृद्धी महामार्गालाही लोकांचा विरोध होता. पण चर्चा केल्यानंतर हा प्रकल्प पूर्ण झाला. कोकणच्या निसर्ग सौंदर्यावर कुठे परिणाम होणार नसेल तर प्रकल्प करावा. लोकांना विश्वासात घेऊन करावे. संवेदनशीलपद्धतीने मार्ग काढावा असं आवाहन राज्य सरकारला केले. मी राजन साळवींचे विधान वाचले. त्यांचा प्रकल्पाला पाठिंबा आहे. बेरोजगार, महागाई मोठ्या प्रमाणात आहे. या प्रकल्पातून रोजगार मिळणे चांगली बाब आहे. परंतु पर्यावरणाचा विचार करायला हवं. उद्धव ठाकरेंनी भूमिका घेतली जनतेचा विरोध असेल तर त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. जनतेला विश्वासात घेऊन संवेदनशील मार्गाने हा प्रश्न निकाली काढावा असं त्यांनी म्हटलं. 

गुन्हे मागे घेतलेतबारसू येथे ज्या आंदोलकांना अटक झालीय त्यांच्याबाबत शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची चर्चा झालीय. त्यात कायद्याच्या चौकटीत राहून हे गुन्हे मागे घेऊ असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. काही गुन्हेही मागे घेतले आहेत. आणखी काही गुन्हे असतील तर मागे घेण्याचं निदर्शनास आणू असं अजित पवार म्हणाले. 

भावी मुख्यमंत्री पोस्टर्स लावू नकामी कधीही माझे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्स लावायला सांगितले नाही. जे लावतायेत त्यांनी बंद करा. अशाप्रकारे पोस्टर्स कुणी लावू नयेत. सर्वोच्च न्यायालय काय निकाल देईल ते जनता बघेल. राजकीय पक्षही बघतील त्यानंतर काय ते ठरवतील असं सूचक विधानही अजित पवारांनी केले.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेlokmat maharashtrian of the year awardsलोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2023Ajit Pawarअजित पवार