शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

LMOTY 2019: मानवतेचा धर्म पाळा, आपला देश नक्की सुधारेल; आप्पासाहेब धर्माधिकारींचा 'गुरूमंत्र'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 16:39 IST

मी जात-पात, धर्म मानत नाही. माझ्यासाठी मन्युष ही जात आणि मानवता हा धर्म आहे - धर्माधिकारी

मुंबई : देशातील बऱ्याच व्यक्ती जात-पात, धर्म या गोष्टींमध्ये अडकलेली आहेत. त्यामुळेच सध्या देशामध्ये माणूस म्हणून जगणे कठीण झाले आहे. पण प्रत्येकाने आपला धर्म पाळला तर देश सुधारण्यास मदत होईल, असे मत जेष्ठ्य निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी 'लोकमत'च्या 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' या पुरस्कार सोहळ्यात व्यक्त केले. यावेळी धर्माधिकारी यांना समाजभूषण जीवन गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.

या कार्यक्रमामध्ये धर्माधिकारी म्हणाले की, " मी जात-पात, धर्म मानत नाही. माझ्यासाठी मन्युष ही जात आणि मानवता हा धर्म आहे. पण देशातील जात आणि धर्मांतील भेदभाव कमी व्हायला हवेत. जर प्रत्येकाने आपला धर्म पाळला तर त्यामध्ये देशाचेच हित आहे. आपल्याला संतांची फार मोठी परंपरा आहे. जर आपल्याला आपण स्वत: कोण आहोत हे जाणायचे असेल तर संताची वचने वाचायला हवीत." 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धर्माधिकारी यांना यावेळी समाजभूषण जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले. पुरस्कार स्वीकारल्यावर धर्माधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शनही केले.

धर्माधिकारी म्हणाले की, " मी कुठला महाराज वैगेरे नाही, मी फक्त चांगले विचार देतो. चांगल्या विचारांतून लोकांचे भले कसे करता येईल, हेच मी पाहत असतो. मी कधीच जाहिरात केली नाही, त्याची मला गरजही नाही. पण शेवटपर्यंत समाजकार्य करत राहणार आणि लोकांकडूनही करवून घेणार." 

मन उत्तम असेल तर देशही चांगला घडू शकतोदेशाला घडवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. पण त्यासाठी प्रत्येक व्यक्तीचे मन चांगले असायला हवे. मनामध्ये चांगले विचार असायला हवेत. मनाला स्थिर करण्यासाठी चांगले विचार असणे महत्वाचे आहे. मन उत्तम असेल तर देशही चांगला घडू शकतो. आपण प्रत्येकाने अडचणींवर मात करायला शिकलो तर ते देशाच्या हिताचे असेल," असे  धर्माधिकारी यांनी सांगितले.

टॅग्स :LMOTY 2019महाराष्ट्रीयन ऑफ द इअर 2019Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे