शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
4
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
5
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
7
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
8
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
9
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
10
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
11
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
12
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
13
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
14
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
16
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
17
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
18
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
19
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
20
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया

परीक्षेला बसण्याची सक्ती नाही, एलएलएमच्या विद्यार्थ्यांना दिलासा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 3:38 AM

एलएलएमची पहिली सत्र परीक्षा पुढे ढकलण्यास उच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. मात्र, या परीक्षेला विद्यार्थ्यांना बसण्याची सक्ती नाही.

मुंबई : एलएलएमची पहिली सत्र परीक्षा पुढे ढकलण्यास उच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. मात्र, या परीक्षेला विद्यार्थ्यांना बसण्याची सक्ती नाही. विद्यार्थी परीक्षेला गैरहजर राहिल्यास त्यांना अनुत्तीर्ण न करता, त्यांना दुस-या सत्र परीक्षेबरोबरच पहिल्या सत्र परीक्षेला बसण्याची परवानगी देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने मुंबई विद्यापीठाला सोमवारी दिले. त्यामुळे एलएलएमच्या ६६० विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला. मंगळवारपासून एलएलएमच्या पहिल्या सत्राची परीक्षा सुरू होत आहे.एलएलएमची पहिली सत्र परीक्षा पुढे ढकलावी, यासाठी काही विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात जनहित व रिट याचिका दाखल केल्या. या याचिकांवरील सुनावणी न्या. भूषण गवई व न्या. बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठापुढे होती. विद्यापीठाने २०१६-२०१७ या शैक्षणिक वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमाचा निकाल लावण्यास विलंब केल्याने, एलएलएमची प्रवेश प्रक्रियाही उशिरा सुरू करावी लागली. यंदा एलएलएममध्ये ६६० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यापैकी ६०० विद्यार्थ्यांना आॅक्टोबर व नोव्हेंबरमध्ये प्रवेश मिळाला, तर ४१ विद्यार्थ्यांना २६ डिसेंबर रोजी प्रवेश देण्यात आला आणि उर्वरित १९ विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया १९ जानेवारी रोजी पूर्ण झाली. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी काही दिवसांतच परीक्षेला बसावे, अशी अपेक्षा करणे योग्य नाही. त्यामुळे २३ जानेवारी रोजी सुरू होणारी पहिल्या सत्राची परीक्षा पुढे ढकलण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली.

टॅग्स :Studentविद्यार्थीexamपरीक्षाMumbai Universityमुंबई विद्यापीठ