LIVE : शिवसेना सुवर्णमहोत्सव
By Admin | Updated: June 19, 2016 18:44 IST2016-06-19T18:44:33+5:302016-06-19T18:44:33+5:30
मराठी माणसाच्या न्याय हक्कासह अन्यायाला वाचा फोडण्यासाठी स्थापन झालेल्या शिवसेनेचा आज सुवर्णमहोत्सवी वर्धापन सोहळा

LIVE : शिवसेना सुवर्णमहोत्सव
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - मराठी माणसाच्या न्याय हक्कासह अन्यायाला वाचा फोडण्यासाठी स्थापन झालेल्या शिवसेनेचा आज सुवर्णमहोत्सवी वर्धापन सोहळा आहे. शिवसेनेच्या स्थापनेला आज ५० वर्ष पूर्ण होत असल्यानं या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आहे.. सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिनाचा कार्यक्रम गोरेगाव येथील एनएससी येथे साजरा केला जातो आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कार्यक्रमस्थळी उपस्थित असून, थोड्याच वेळात ते शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत.
शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिनाच्या निमित्ताने शिवसेनेने अवघ्या मुंबईला भगवा साज चढवला असल्याचे पाहायला मिळते आहे. अनेक ठिकाणी भगवे झेंडे आणि होर्डिंग्ज लावण्यात आले असून, या होर्डिंग्जच्या माध्यमातून वाटचालीची माहिती देण्यात आली आहे.