शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

लिव्ह इन रिलेशनशिप प्रकरण; नाईक यांना अटक करून चौकशी करणार - रूपाली चाकणकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 08:09 IST

चाकणकर म्हणाल्या की, गणेश नाईक यांच्या विरोधात एका महिलेने राज्य महिला आयोगात ई-मेलद्वारे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आयोगात प्रत्यक्ष उपस्थित राहत या महिलेने घटनेचा वृतांत सांगितला व तक्रार दाखल केली.

मुंबई : भाजपचे ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात दाखल झालेले दोन्ही गुन्हे गंभीर स्वरूपाचे आहेत. नाईक यांना अटक करून चौकशी आणि पुढील कारवाई केली जाईल, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी रविवारी सांगितले.चाकणकर म्हणाल्या की, गणेश नाईक यांच्या विरोधात एका महिलेने राज्य महिला आयोगात ई-मेलद्वारे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आयोगात प्रत्यक्ष उपस्थित राहत या महिलेने घटनेचा वृतांत सांगितला व तक्रार दाखल केली. या तक्रारीची गंभीर दखल घेत महिला आयोगाने नवी मुंबई पोलिसांना तपास करून ४८ तासांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर १५ तारखेला नवी मुंबई पोलीस ठाण्यात गणेश नाईक यांच्या विरोधात आयपीसी ५०६ ब हा गुन्हा दाखल झाला. १६ तारखेला नेरूळ पोलीस ठाण्यात आयपीसी ३७६ हा गुन्हा दाखल झाला आहे. दाखल झालेले दोन्ही गुन्हे हे गंभीर स्वरूपाचे असून, गणेश नाईक यांना अटक करून त्याची चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

अडचणीत वाढ -- ऐरोलीचे भाजपचे आमदार गणेश नाईक यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. एका महिलेच्या तक्रारीवरून त्यांच्यावर जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. - पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या चोवीस तासांत त्याच महिलेच्या तक्रारीवरून नेरूळ पोलीस ठाण्यात त्यांच्यावर बलात्काराचा दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

काय आहे प्रकरण ?नाईक यांच्या विरोधात १९९३ पासून एका महिलेला लग्नाचे आमिष देऊन व जीवे मारण्याची धमकी देऊन शोषण केले. आमिषाला आणि त्यांनी दिलेल्या धमकीमुळे ही महिला त्यांच्यासह लिव्ह-इनमध्ये आहे. या संबंधातून त्यांना १५ वर्षांचा मुलगा आहे. पीडित महिलेने लग्नाची मागणी केल्यावर नाईक यांनी तिला जीवे मारण्याची धमकी दिली. वैवाहिक अधिकार व मुलाला पितृत्वाचा अधिकार मागितला असता मुलासह जीवे मारण्याची धमकी दिली. नाईक यांचा मुलगा संदीप नाईक जीवे मारण्याच्या धमक्या देत असल्याची तक्रार या महिलेने आयोगाकडे केली होती. 

टॅग्स :Rupali Chakankarरुपाली चाकणकरBJPभाजपाGanesh Naikगणेश नाईक