अंधेरीत 'लिव्ह-इन' कपलची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2016 08:08 IST2016-09-03T08:03:05+5:302016-09-03T08:08:02+5:30
अंधेरी येथे 'लिव्ह-इन'मध्ये राहणा-या कपलने आत्महत्या केल्याने एकच खळबळ माजली आहे.

अंधेरीत 'लिव्ह-इन' कपलची आत्महत्या
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३ - मुंबईतील अंधेरी येथे 'लिव्ह-इन'मध्ये राहणा-या कपलने आत्महत्या केल्याने एकच खळबळ माजली आहे. अंधेरी एमआयडीसीतील धनलक्ष्मी अपार्टमेंटमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असून स्वाती गोहिल व विवेक गुप्ता अशी मृतांचे नावे असल्याचे समजते.
स्वाती व विवेक यांच्या घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजा-यांना शंका आली व त्यांनी तत्काळ पोलिसांना खबर केली. पोलिसांनी फ्लॅटचे दार उघडले असता स्वाती व विवेक हे मृतावस्थेत आढळले. त्या दोघांनी तीन ते चार दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त होत आहे.
आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी त्या दोघांचे ‘लिव्ह इन’मध्ये राहणं त्यांच्या कुटुंबियांना मान्य नव्हतं. लग्नास परवानगी न मिळाल्यानेच त्यांनी जीवन संपवण्याचा निर्णय घेतल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.