शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Milk Supply Live Update - दूध दरवाढीसाठी स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक, टँकरमधील दूध ओतले रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2018 15:03 IST

राज्यात ठिकठिकाणी दुधाचे टँकर अडविण्यात आले

मुंबई - राज्यातील काही सहकारी व खासगी दूध उत्पादकांनी दूध दरात केलेली तीन रुपयांची दरवाढ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी फेटाळून लावत रविवारी ( 15 जुलै ) रात्री १२ वाजेपासून दुधाचे आंदोलन सुरू केले. राज्यात ठिकठिकाणी दुधाचे टँकर अडविण्यात आले. हे आंदोलन मोडून काढण्यासाठी सरकारने कंबर कसली असून आंदोलकांची धरपकड सुरू केली आहे. खा. राजू शेट्टी यांनी रविवारी रात्री बारानंतर पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासमोर आंदोलन केले. 

Live Updates -

- सोलापूर : दूध दरवाढीसाठी स्वाभिमानीचे कार्यकर्ते आक्रमक, टँकरमधील दूध सोडण्याच्या प्रकारानंतर आता गवळी कार्यकर्त्याच्या रडारावर

- कुरघोमध्ये दूध संकलन करणाऱ्या गवळ्याचे दूध रस्त्यावर सांडले

- संग्रामपूर तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं वरवट बकाल येथील बस थांबा रस्त्यावर दूध ओतून सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवला

- दुधाच्या प्रश्नी विधानपरिषद २० मिनिटे तहकूब

- दूध अनुदानावरून विरोधकांचा विधानसभेत सभात्याग

- शालेय पोषण आहारात दुधाच्या पदार्थांचा समावेश व्हावा – सुनील प्रभू

- विधानसभेचे कामकाज पुन्हा सुरू

- विरोधकांनी आवाज उठवल्याने विधानसभेत गोंधळ, कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब

- दूधाच्या प्रश्नावरून विरोधक विधानसभेत आक्रमक

- सरकारने बळाचा वापर करुन दूध उत्पादकांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करु नये किंवा तशी धमकीही देऊ नये -  विखे-पाटील

- राज्यात शेतकऱ्यांवर दडपशाही झाली तर त्याची जबर किंमत सरकारला मोजावी लागेल, हे सरकारने ध्यानात ठेवावे - विखे पाटील

- कोल्हापूर : गोकुळ संघाचं दूध मुंबईकडे रवाना, पोलीस बंदोबस्तात गोकुळचे 12 टँकर मुंबईला रवाना

- राजू शेट्टींसोबत चर्चा करण्यास तयार पण ते चर्चा करत नाहीत - मुख्यमंत्री

- राजू शेट्टींच्या दूध आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा, विधानसभेत स्थगन प्रस्ताव आणणार- राधाकृष्ण विखे-पाटील

- हुन्नूर ता.मंगळवेढा येथे हनुमान मंदिरात मुर्तीवर दुधाचा अभिषेक करून संपाला सुरुवात, दूध उत्पादक शेतकऱ्यांचं रस्त्यावर दुध ओतून आंदोलन सुरू

- माढा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

- अहमदनगर : सोलापूर रस्त्यावर दूध ओतून शेतकऱ्यांचा आंदोलनात सहभाग

- सोलापूर : दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी आक्रमक, नेचर दुध कंपनीच्या दुधाच्या पिशव्या रस्त्यावर फोडल्या 

- जळगाव : चाळीसगावमध्ये शेतकऱ्यांचे रास्तारोको आंदोलन, रस्त्यावरच ठिय्या मांडत एक तास रोखून धरला रस्ता 

- दूध दरवाढ आंदोलनामुळे राजहंस, प्रभातसह सर्वच दूध संकलन आणि वितरण बंद राहणार

- क्रांती, माऊली, मातोश्री, सोनईच्या गाड्या फोडल्या

- पुण्यात दुधाच्या पाच गाड्या कार्यकर्त्यांनी फोडल्या

- बुलडाण्यात दूध दरवाढ आंदोलनाला हिंसक वळण

- सौराष्ट्र एक्स्प्रेसला अमूल दुधाचा डबा जोडला नाही

- स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचे पडसाद

- सांगोल्यात महूद येथे रस्त्यावर दूध ओतून निषेध

- आंदोलनाचा मुंबईतील दूध पुरवठ्यावर परिणाम नाही

- अमरावतीत दूध टँकर फोडण्याचा प्रयत्न 

- कोल्हापूरात शिरोळमध्ये दूध बंद आंदोलन 

- नगरमधील दूध संकलन, वितरण आज बंद राहणार

- वरवंड टोलनाक्यावर टँकरमधील दूध ओतलं

- करमाळा : केम येथे शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून आंदोलन सुरू केले

- गोकूळ दुध संघाकडून आज दूध संकलन बंद 

- गोकुळ दुध संघाचा राजू शेट्टीच्या आंदोलनाला पाठिंबा

- वैजापुरात दूध आंदोलन तापले

- दुधाला प्रतिलिटर ५ रुपये दरवाढ मिळावी अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांची मागणी

- संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी संगमनेरवरुन औरंगाबादला जाणारा दुधाचा आयशर टेम्पो तालुक्यातील हडस पिंपळगाव येथे रविवारी रात्री फोडला.

- दूध दरावाढीच्या मुद्यावर आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी नंतर त्या टेम्पो मधील दुधाचे संपूर्ण केरेट रस्त्यावर फेकले.

- मुंबई आणि उपनगरांमध्ये दुधाचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी वारणाकडून तयारी

- वारणा दूध महासंघाकडे 3 दिवस पुरेल एवढा साठा

- मुंबईला होणाऱ्या दूध पुरवठ्याची पॅकिंगही पूर्ण, वारणा मुंबईत दररोज 2 लाख लिटर दूध पुरवठा  करते

- रविवारी रात्री १२ वा. ग्रामदैवतांना अभिषेक घालून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते दूध आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले.

- पोलिसांनी रविवारी दुपारी कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली. त्यांच्याकडून शपथपत्रे लिहून घेतली.

- स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंबेगाव (पुणे) येथील गोवर्धन दूध संघाचा दूध वाहतूक करणारा टँकर फोडून दूध रस्त्यावर सोडून दिले.

- -खा. राजू शेट्टी यांनी रविवारी रात्री बारानंतर पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासमोर आंदोलन केले. 

- पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच संघांनी सोमवारी दूध संकलन बंदचा निर्णय घेतला आहे. एक दिवसआधीच संघांनी दूध संकलन बंद ठेवले.

- सरकारने दुधाच्या भुकटीला अनुदान देण्याचे आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांना प्रतिलिटर ३ रुपये दरवाढ देण्याचा निर्णय झाला आहे. शहरांमध्ये दुधाचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी सरकारने उपाययोजना केली आहे. प्रसंगी पोलीस बंदोबस्तात दुधाचे टँकर आणू - महादेव जानकर, दुग्धविकास मंत्री

- दूध संघाने दोन दिवस आधीच दुधाचा मुंबईला होणारा पुरवठा वाढवून किमान दोन दिवस येथे दूधटंचाई भासणार नाही, याची काळजी घेतली आहे.

-वरूड (अमरावती) : दूध दरवाढीच्या मुद्द्यावर आक्रमक होऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी दुधाचा टँकर पेटविण्याचा प्रयत्न करून आंदोलन छेडले.

 

टॅग्स :milkदूध