शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

नगरपालिका निवडणुका : सर्वोच्च न्यायालयाचे ऐकायचे की राज्य सरकारचे? निवडणूक आयोगासमोर पेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2022 10:40 IST

निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर स्थगित केली त्याच टप्प्यावरून पुढे सुरू करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आयोगाला दिल्याने महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला होता.

मुंबई : राज्यातील ९२ नगरपालिका आणि चार नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती राज्य सरकारकडून राज्य निवडणूक आयोगाला केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले असताना आता राज्य सरकारचे ऐकायचे की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करायचे असा पेच आयोगासमोर असेल.

याआधी महाविकास आघाडी सरकारच्या काळात आयोगाने जिल्हा परिषद, नगर पंचायतींच्या निवडणुका घेतल्या होत्या. तत्कालीन सरकारने ओबीसी आरक्षण, कोरोना, आदी कारणे देऊन निवडणुका रोखण्याचा  प्रयत्न केला होता, पण त्यावेळी आयोगाने दाद दिली नाही आणि ओबीसी आरक्षणाशिवायच निवडणुका घेतल्या होत्या. प्रभाग रचनेचे अधिकार स्वत:कडे घेत त्या आड निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकारने केला, पण निवडणूक प्रक्रिया ज्या टप्प्यावर स्थगित केली त्याच टप्प्यावरून पुढे सुरू करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आयोगाला दिल्याने महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला होता.

ओबीसी आरक्षण आणि पाऊस ही दोन कारणे देऊन १८ ऑगस्ट रोजीच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात, अशी भूमिका मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने राज्यात अतिवृष्टीची शक्यता नाही, अशा भागात निवडणुका घ्या आणि त्याचा पूर्ततता अहवाल सादर करा, असे आदेश दिले आहेत. त्यानुसार आयोगाने निवडणूक जाहीर केली आहे.

राज्यातील नव्या सरकारला दोन  प्रमुख कारणांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकूणच निवडणुका पुढे ढकलायच्या आहेत. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेतल्या तर नवीन सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका केली जाईल. ओबीसी आरक्षण महाविकास आघाडी सरकारला टिकविता आले नाही अशी टीका करणाऱ्या भाजपवर त्यांचीच टीका उलटेल. त्यामुळे भाजपला आता निवडणूक नको आहे. याशिवाय महापालिका, जिल्हा परिषदा, नगर परिषदांच्या वॉर्ड/गणांची जी रचना महाविकास आघाडी सरकारच्या काळात करण्यात आली ती भाजपसाठी सोईची नाही. त्यामुळे नवीन रचना करून त्या आधारे निवडणुका व्हाव्यात यावर नवीन सरकारचा भर असेल.

काँग्रेसचाही इशारानगर परिषदांच्या १८ ऑगस्टला होणाऱ्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी आता भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादीनेही केली आहे. भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे व राष्ट्रवादीचे  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक घेऊ नये अशी मागणी केली. हीच मागणी करून काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी, तरीही निवडणूक घेतली तर काँग्रेस पक्ष सरकारविरुद्ध आंदोलन करेल, असा इशारा दिला आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकMaharashtraमहाराष्ट्रSupreme Courtसर्वोच्च न्यायालयEknath Shindeएकनाथ शिंदे