शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

विक्रीयोग्य मालमत्तांची यादी तासाभरात द्या, मुंबई उच्च न्यायालयाचे डी. एस. कुलकर्णींना आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2017 18:43 IST

मुंबई- प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णींना उच्च न्यायालयानं फटकारलं आहे. तारण ठेवलेल्या मालमत्तांची यादी सादर करा, तात्काळ विक्रीयोग्य मालमत्तांची यादी एक तासात द्या, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत.

मुंबई- प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णींना उच्च न्यायालयानं फटकारलं आहे. तारण ठेवलेल्या मालमत्तांची यादी सादर करा, विक्रीयोग्य मालमत्तांची यादी एक तासाभरात द्या, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. उच्च न्यायालयाला मोलभाव ठरवण्याचा मंच समजू नका, असं म्हणत न्यायालयानं स्पष्ट शब्दांत डी. एस. कुलकर्णींवर ताशेरे ओढले आहेत.गेल्या तीन सुनावणीदरम्यान तुम्ही मुदत वाढवून घेऊन फक्त न्यायालयाची दिशाभूल केली आहे. इतक्या वर्षात कमावलेला रोख नफा थकीत रकमेच्या 25% म्हणून तातडीनं जमा करा, असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. गुंतवणूकदारांना फसविण्याचा कोणताही इरादा नाही. आमच्याकडे एकूण 48 लाख चौरस फूट एवढी मालमत्ता आहे. ज्यांच्या मुदतठेवीची मुदत पूर्ण झाली अशी 209 कोटींची थकबाकी आहे. जानेवारी ते ऑक्टोबरपर्यंत 30 कोटींचे वाटप केले आहे. 1600 नागरिकांनी आमची नवी योजना स्वीकारली आहे. मार्च 2018पर्यंत आम्ही सर्वांचे पैसे देऊ शकू व सर्व सुरळीत करू, असं आश्वासन डी. एस. कुलकर्णींनी दिलं होतं. 

काम पूर्ण केले नाही तर पैसे गेले कोठे? डीएसके यांनी आमच्या इमारतीचे काम पूर्ण केले नाही, तर ते पैसे गेले कोठे, असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी अनेक गुंतवणूकदारांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. दरम्यान, डीएसके यांच्याकडे फ्लॅट घेताना कर्ज घेतलेल्यांना टाटा फायनान्स कॅपिटल हाऊसिंग फायनान्स कंपनीने कायदेशीर नोटिसा पाठविण्यास सुरुवात केली आहे. 

ना घर का ना घाटकाडीएसके यांच्या ‘आधी घर पैसे नंतर’ या योजनेनुसार फ्लॅट बुक केलेल्यांना डिसेंबर 2016मध्ये ताबा मिळणार होता. त्यानंतर कर्जाचा मासिक हप्ता सुरू होणार होता. तोपर्यंतचा हप्ता डीएसके भरणार होते. त्यांनी तो न भरल्याने फायनान्स कंपन्यांनी फ्लॅटधारकांच्या खात्याला अ‍ॅटॅचमेंट लावली आहे. त्यांनी आगाऊ दिलेले धनादेश बँकेत भरले. ते न वटल्याने त्यांना आता कायदेशीर नोटिसा येऊ लागल्या आहेत. त्यांच्या खात्यातून चेक न वटता परत गेल्याने ते डिफॉल्टर ठरल्याने त्यांचे क्रेडिट रेटिंग कमी झाले आहे. आता त्यांना दुस-या कोणत्याही कामासाठी कर्ज घ्यायचे असेल तर ते त्यासाठी अपात्र ठरू शकतील.डीएसके चिटर नाहीत- राज ठाकरेडीएसके चिटर नाहीत, ते अडकले आहेत. त्यांना या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मराठी माणसांनी पुढे यावं, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. डीएसके कुणाचे पैसे बुडवणार नाहीत, त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि त्यांच्या पाठीशी उभं राहा, असं आवाहन राज ठाकरेंनी गुंतवणूकदारांना केलं आहे. 

टॅग्स :D.S.Kulkarniडी.एस. कुलकर्णीPuneपुणेMumbaiमुंबई