‘बोगस’ विद्यापीठांची यादी झाली जाहीर

By Admin | Updated: July 11, 2016 04:57 IST2016-07-11T04:57:31+5:302016-07-11T04:57:31+5:30

विद्यापीठ अनुदान आयोगाने बोगस विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे. यात देशभरातील तब्ब्ल २२ विद्यापीठांना बोगस विद्यापीठांच्या यादीत टाकले आहे.

List of 'Bogus' Universities Announced | ‘बोगस’ विद्यापीठांची यादी झाली जाहीर

‘बोगस’ विद्यापीठांची यादी झाली जाहीर


मुंबई : विद्यापीठ अनुदान आयोगाने बोगस विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे. यात देशभरातील तब्ब्ल २२ विद्यापीठांना बोगस विद्यापीठांच्या यादीत टाकले आहे. बोगस विद्यापीठांच्या यादीत राज्यातील नागपूर येथील राजा अरेबिक विद्यापीठाचाही समावेश आहे.
विद्यापीठ अनुदान आयोग दरवर्षी देशभरातील बोगस विद्यापीठांची यादी जाहीर करते. यंदाही ही यादी जाहीर करण्यात आली आहे. बोगस विद्यापीठांच्या यादीत गेल्या वर्षीच्या तुलनेत आणखी एका विद्यापीठाची भर पडली आहे. देशभरातील २२ बोगस विद्यापीठांमध्ये
सर्वाधिक म्हणजे १० बोगस विद्यापीठे उत्तर प्रदेशातील आहेत. तर त्याखालोखाल दिल्ली येथील ६ विद्यापीठे बोगस ठरली आहेत.
विशेष म्हणजे नागपुरातील राजा अरेबिक विद्यापीठाचा बोगस विद्यापीठांच्या यादीत समावेश आहे. बोगस विद्यापीठांची ही यादी ४ॅू.ंू.्रल्ल या संकेस्थळावर खुली करण्यात आली आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे जाहीर करण्यात आलेल्या बोगस विद्यापीठांतील पदवी अवैध
ठरणार आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांनी बोगस विद्यापीठांच्या यादीत प्रवेश घेताना विचार करावा, असे यूजीसीचे सचिव प्रा. जसपाल संधू यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)

ही आहेत बोगस विद्यापीठे
मैथिली विद्यापीठ, बिहार
कमर्शिअल विद्यापीठ लिमिटेड, दिल्ली
युनायटेड नेशन्स विद्यापीठ, दिल्ली
व्होकेशनल विद्यापीठ, दिल्ली
एडीआर सेंट्रिक ज्युरिडीशल विद्यापीठ, नवी दिल्ली
इंडियन इन्स्टिट्यूशन आॅफ सायन्स अ‍ॅण्ड इंजिनीअरिंग, नवी दिल्ली
बडागणवी सरकार वर्ल्ड ओपन युनिव्हर्सिटी, कर्नाटक
सेंट जॉन विद्यापीठ, केरळ
राजा अरेबिक विद्यापीठ, नागपूर (महाराष्ट्र)
डी.डी.बी. संस्कृत विद्यापीठ, तामिळनाडू
इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन, कोलकाता
इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन अ‍ॅण्ड रिसर्च, ठाकूरपूरकर, कोलकाता
वाराणसिया संस्कृत विश्वविद्यालय, दिल्ली
महिला ग्राम विद्यापीठ, उत्तर प्रदेश
गांधी हिंदी विद्यापीठ, उत्तर प्रदेश
नॅशनल युनिव्हर्सिटी आॅफ इलेक्ट्रो कॉम्प्लेक्स होमिओपॅथी, कानपूर, उत्तर प्रदेश
नेताजी सुभाषचंद्र बोस ओपन युनिव्हर्सिटी, उत्तर प्रदेश
उत्तर प्रदेश विश्वविद्यालय, मथुरा, उत्तर प्रदेश
महाराणा प्रताप शिक्षा निकेतन विश्वविद्यालय, उत्तर प्रदेश
इंद्रप्रस्थ शिक्षा परिषद, उत्तर प्रदेश
गुरुकुल विश्वविद्यालय, उत्तर प्रदेश
नबाभारत शिक्षा परिषद, ओडिशा

Web Title: List of 'Bogus' Universities Announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.