भाजपाची 16 नावांची यादी तयार
By Admin | Updated: October 28, 2014 01:50 IST2014-10-28T01:50:08+5:302014-10-28T01:50:08+5:30
मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्षांसह 16 मंत्र्यांची यादी भाजपाने तयार ठेवली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर मंगळवारी शिक्कामोर्तब झाल्यानंतर ही नावे जाहीर होऊ शकतात.
भाजपाची 16 नावांची यादी तयार
रघुनाथ पांडे - नवी दिल्ली
मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्षांसह 16 मंत्र्यांची यादी भाजपाने तयार ठेवली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर मंगळवारी शिक्कामोर्तब झाल्यानंतर ही नावे जाहीर होऊ शकतात.
भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा व ओम माथुर यांची भेट घेऊन मंत्रिपद देण्याची मागणी केली. सरकारमध्ये तुम्ही असणार, असा शब्द शहा यांनी दिला. मात्र रामदास आठवले, राजू शेट्टी किंवा विनायक मेटे यांच्या सहभागाबाबत चर्चा झालेली नाही. फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, गिरीश बापट, प्रकाश महेता, हरिभाऊ बागडे, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, आशिष शेलार, राम शिदे, सुरेश खाडे, कृष्णा खोपडे, संभाजी निलंगेकर, भाऊसाहेब फुंडकर, माधुरी मिसाळ, विष्णू सावरा, सुभाष देशमुख यांची नावे मंत्रिपदाच्या यादीत असल्याचे सूत्रने सांगितले. चैनसुख संचेती व राज पुरोहित हे पक्षांतर्गत राजकारण व प्रादेशिक समतोलामुळे मागे पडल्याचे सूत्रंचे म्हणणो आहे.