बाबासाहेबांच्या रूपाने शिवकाळाशी दुवा
By Admin | Updated: January 31, 2015 05:12 IST2015-01-31T05:12:17+5:302015-01-31T05:12:17+5:30
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे आपले शिवकाळाच्या इतिहासाशी असणारे एक दुवा आहेत. इतिहास आणि कल्पनांचा अनोखा मेळ घालून

बाबासाहेबांच्या रूपाने शिवकाळाशी दुवा
पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे आपले शिवकाळाच्या इतिहासाशी असणारे एक दुवा आहेत. इतिहास आणि कल्पनांचा अनोखा मेळ घालून त्यांनी शिवकालीन इतिहासाची मांडणी केली आहे. शिवाजी महाराजांच्या विचारांच्या संग्रहालयाची उभारणी करताना त्यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल, असे एशियन हेरिटेज फाउंडेशनचे संस्थापक- अध्यक्ष राजीव सेठी यांनी सांगितले. राजीव सेठी यांनी आपल्या संकल्पनेतील शिवाजी महाराजांच्या विचारांचे संग्रहालय उभारण्यासंदर्भात पुरंदरे यांची पुण्यात भेट घेतली. ते म्हणाले, ‘‘ पुरंदरे यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या अभ्यासासाठी समर्पित केले आहे. एक निश्चित ध्येय ठरवून त्यांचे काम सुरू आहे. समाजात अशी फार थोडी माणसे राहिलेली आहेत. बाबासाहेबांनी आपले आयुष्य शिवरायांचा अभ्यास करण्यासाठी घालविले. त्यांच्याकडून खूप काही घेण्यासारखे आहे. इतिहास आणि कल्पनांचा अनोखा मेळ घालून त्यांनी शिवकालीन इतिहासाची मांडणी केली आहे, हे माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण, एखादी कला जोपर्यंत आपल्या हृदयात कोरली जाऊ शकत नाही, तोपर्यंत त्या कलेला कला म्हणता येणार नाही.’’