शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

लिंगायत आणि बंजारा संघटनांकडून लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2024 15:41 IST

वीरशैव- लिंगायत समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शरण संकुल ट्रस्ट संघटनेनं महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे.

CM Eknath Shinde ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये अटीतटीचा सामना रंगत आहे. त्यामुळे मतांची गोळाबेरीज करण्यासाठी राजकीय नेत्यांकडून शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न सुरू आहेत. अशातच लिंगायत आणि बंजारा समाजातील दोन संघटनांचा पाठिंबा मिळवण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आलं आहे. मुंबई महानगर , ठाणे जिल्हा, नवी मुंबई आणि नाशिकमध्ये वीरशैव- लिंगायत समाजाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शरण संकुल ट्रस्ट संघटनेनं महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. तसंच राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या पंडित राठोड यांनीही आपण लोकसभा निवडणुकीत महायुतीचे समर्थन करत असल्याचं जाहीर केलं आहे. वीरशैव लिंगायत समाजातील तरुणांमध्ये उद्योजक घडवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जगतज्योती श्री संत महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळचे गठन केल्याबद्दल महाराष्ट्रातील  वीरशैव लिंगायत समाजातर्फे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नुकतेच आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी कोल्हापूर येथील लिंगायत समाजाचे नितीन पाटील, नवी मुंबई वीरशैव लिंगायत समाजाच्या शरण संकुल ट्रस्टचे अध्यक्ष श्री रामलिंगय्या स्वामी,  ठाणे जिल्हाचे सचिव विश्वनाथ महांतशेट्टर, खारघर येथील आनंद गवी तसेच कल्याण, डोंबिवली, अंबरनाथमधील इतर वीरशैव-लिंगायत समाजाचे प्रमुख पदाधिकारी आणि समाजबांधव यांच्यासह मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे देखील उपस्थित होते.

बंजारा परिषदेच्या पत्रकात काय म्हटलं आहे?

बंजारा राष्ट्रीय परिषदेचे राष्ट्रीय महासचिव पंडित राठोड यांनी एक पत्रक काढत महायुतीला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. शिवसेना खासदार आणि कल्याण डोंबिवलीतील महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांना लिहिलेल्या या पत्रकात म्हटलं आहे की, "आपल्या मतदार संघामध्ये गोरबंजारा समाज मोठ्या प्रमाणात असून एक गठ्ठा मतदानासाठी गोरबंजारा समाज हा अत्यंत निर्णायक व प्रभावी आहे. गोरबंजारा समाजामुळे आपल्या विजयाचा मार्ग सोपा होणार आहे व मताधिक्य वाढणार आहे. गोरबंजारा समाजामध्ये अखिल भारतीय स्तरावर राष्ट्रीय बंजारा परिषद ही सर्वात मोठी संघटना असून या संघटनेमध्ये समाजातील धार्मिक, राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या प्रमाणात आहेत. गोरबंजारा समाजातील सर्व तांडे धर्मपीठाशी राष्ट्रीय बंजारा परिषदेमुळे जोडले गेल्याने तांडा स्तरावरील नायक, कारभारी, पुजारी व गोरबंजारा समाजाचे, तांडा समिती नायकण, महिला समिती, युवा धर्म रक्षक, गोरबंजारा धर्मपीठाचे पदाधिकारी, पालखीचे पदाधिकारी सर्व राष्ट्रीय बंजारा परिषदेशी निगडित आहेत. राष्ट्रीय बंजारा परिषद गोरबंजारा समाजाचे सर्वात मोठे नेटवर्क असलेली संघटना असून राष्ट्रीय बंजारा परिषदेमुळे आपल्या मतदारसंघात प्रचंड मोठ्या प्रमाणात मताधिक्य मिळून आपला विजय निश्चित होणार आहे," असा विश्वास राठोड यांनी व्यक्त केला आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेनाmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४