लिफ्टमध्ये डोकावणे चिमुरडीच्या जिवावर बेतले
By Admin | Updated: May 7, 2017 05:16 IST2017-05-07T05:16:20+5:302017-05-07T05:16:20+5:30
लिफ्ट वर-खाली कशी होते, हे पाहण्यासाठी कुतूहलाने लिफ्टमध्ये डोकावणे शनिवारी एका १२ वर्षीय मुलीच्या जिवावर बेतले. बांधकाम

लिफ्टमध्ये डोकावणे चिमुरडीच्या जिवावर बेतले
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लिफ्ट वर-खाली कशी होते, हे पाहण्यासाठी कुतूहलाने लिफ्टमध्ये डोकावणे शनिवारी एका १२ वर्षीय मुलीच्या जिवावर बेतले. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत सहाव्या मजल्यावर तिने लिफ्टमध्ये डोकावताच वरच्या मजल्यावरून आलेल्या लिफ्टमुळे ती चिरडली गेली. कुंडू आरिफ झवेरी (१२) असे मुलीचे नाव असून, या प्रकरणी निर्मलनगर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
वांद्रे पूर्वेकडील बेहराम पाड्यात आशियाना या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत कुंडू कुटुंबीयांसोबत राहत होती. शनिवारी सकाळी ७च्या सुमारास ती आतेबहिणीसोबत खेळत होती. त्याच दरम्यान लिफ्ट खाली-वर कशी होते, या कुतूहलातून तिने सहाव्या मजल्यावरून खाली डोकावून पाहिले. त्याच दरम्यान सातव्या मजल्यावर असलेली लिफ्ट खाली येताच कुंडूच्या डोक्यावर आदळली. तिला तत्काळ भाभा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तिला उपचारादरम्यान पावणेआठच्या सुमारास मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केल्याची माहिती निर्मलनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक वासुदेव जमदाडे यांनी दिली.