एक कोटीचे दागिने लंपास

By Admin | Updated: September 19, 2016 05:40 IST2016-09-19T05:40:19+5:302016-09-19T05:40:19+5:30

सराफा व्यावसायिकाला लुटल्याची घटना शनिवारी रात्री कर्नाक बंदर येथील मुसाफीर खान्याजवळील उड्डाणपुलाखाली घडली.

Lift one crore jewels | एक कोटीचे दागिने लंपास

एक कोटीचे दागिने लंपास


मुंबई : दुचाकीहून आलेल्या चोरांनी सराफा व्यावसायिकाला लुटल्याची घटना शनिवारी रात्री कर्नाक बंदर येथील मुसाफीर खान्याजवळील उड्डाणपुलाखाली घडली. चोरीला गेलेल्या बॅगेत सुमारे एक कोटी रुपयांचे दागिने असल्याचे सांगण्यात येत असून, या प्रकरणाची नोंद पायधुनी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. दक्षिण मुंबईतील सराफ व्यावसायिक दोन कामगारांसमवेत टॅक्सीतून निघाले होते. कर्नाक बंदरजवळील मुसाफीर खान्याजवळील एका सार्वजनिक शौचालयाजवळ अचानक दोन दुचाकीस्वारांनी त्यांची टॅक्सी अडवली आणि चाकूचा धाक दाखवत बॅग लंपास केली. दरम्यान, बॅगेत सोन्याचे दागिने आणि हिरे होते. पाच जणांनी पाळत ठेवून हे कृत्य केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Lift one crore jewels