मुंबईतील पाकमोडिया स्ट्रीट गोळीबारातील तिघांना जन्मठेप
By Admin | Updated: August 22, 2015 01:04 IST2015-08-22T01:04:08+5:302015-08-22T01:04:08+5:30
मुंबईतील पाकमोडिया स्ट्रीटवर एप्रिल २०११ मध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम व छोटा राजन गँगमध्ये गोळीबार झाला होता़ यामध्ये दाऊदचा भाऊ

मुंबईतील पाकमोडिया स्ट्रीट गोळीबारातील तिघांना जन्मठेप
नाशिक : मुंबईतील पाकमोडिया स्ट्रीटवर एप्रिल २०११ मध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम व छोटा राजन गँगमध्ये गोळीबार झाला होता़ यामध्ये दाऊदचा भाऊ इब्राहिम कासकरचा अंगरक्षक आरिफचा खून करण्यात आला होता़ या प्रकरणी आरोपी इंद्र लालबहादूर खत्री (३१, नेपाळ), बिलाल सय्यद मुस्तफा सय्यद (३२, कौसा, मुंबई), अब्दुल रशाद अब्दुल रशीद शेख या तिघांना मुंबईच्या विशेष मोका न्यायालयाचे न्यायाधीश ए़ एल़ पानसरे यांनी जन्मठेप व आर्थिक दंडाची शिक्षा सुनावली आहे़
गोळीबाराच्या घटनेनंतर आरोपी इंद्र खत्री, बिलाल सय्यद या दोघांना जे़ जे़ हॉस्पिटलजवळ पकडण्यात आले होते़ या खटल्यासाठी शासनाने अॅड़ अजय मिसर यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती़ यामध्ये त्यांनी ५३ साक्षीदार तपासले. गोळीबारात मृत्यू झालेला आरिफ हा गँगस्टर नसून अंगरक्षक असल्याचे न्यायालयासमोर आले़ तसेच त्याच्या शरीरातून मिळालेल्या गोळ्या या आरोपींनी वापरलेल्या बंदुकीतून झाडल्याचा अहवाल व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार महत्त्वाचे ठरले़