विवाहितेला जाळणाऱ्या चौघा नराधमांना जन्मठेप

By Admin | Updated: November 8, 2015 00:10 IST2015-11-08T00:10:08+5:302015-11-08T00:10:08+5:30

विवाहितेला जाळून मारल्याप्रकरणी कापडणे येथील चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. पी. कर्णिक यांनी शनिवारी हा निकाल दिला.

Life imprisonment for four people who burn a marriage | विवाहितेला जाळणाऱ्या चौघा नराधमांना जन्मठेप

विवाहितेला जाळणाऱ्या चौघा नराधमांना जन्मठेप

धुळे : विवाहितेला जाळून मारल्याप्रकरणी कापडणे येथील चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. पी. कर्णिक यांनी शनिवारी हा निकाल दिला. लोटन दगा बडगुजर, विनोद लोटन बडगुजर, जिजाबाई लोटन बडगुजर, रत्नाबाई विक्की पवार यांनी अश्विनी योगेश बडगुजर (२५) हिला १३ जून २०१४ रोजी अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. त्यात आश्विनीचा मुलगा पवन (३) हाही भाजला होता. त्याला वाचवताना योगेश बडगुजर हेसुद्धा गंभीर भाजले होते. रुग्णालयात १९ जूनला आश्विनीचा मृत्यू झाला होता. काही दिवसांनी तिचे पती योगेश यांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

Web Title: Life imprisonment for four people who burn a marriage