मोबाईल रीचार्जसाठी पैसे न दिल्याने जन्मदात्याचा खून

By Admin | Updated: May 25, 2016 15:18 IST2016-05-25T15:18:23+5:302016-05-25T15:18:23+5:30

रिचार्जसाठी पैसे न दिल्याने मुलाने मित्रांच्या सोबतीने जन्मदात्याचा खून केल्याची घटना खडदगाव ता. नांदुरा येथे २४ मे रोजी घडली.

Life donor's blood is not paying for mobile recharge | मोबाईल रीचार्जसाठी पैसे न दिल्याने जन्मदात्याचा खून

मोबाईल रीचार्जसाठी पैसे न दिल्याने जन्मदात्याचा खून

ऑनलाइन लोकमत 
खामगाव, दि. २५ -  पाकीट खर्च व मोबाईल रिचार्जसाठी पैसे न दिल्याने मुलाने मित्रांच्या सोबतीने जन्मदात्याचा खून केल्याची घटना खडदगाव ता. नांदुरा येथे २४ मे रोजी घडली. 
 
याप्रकरणी २५ मे रोजी पिंपळगाव राजा पोलिसांनी तिघांविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. विठ्ठल निवृत्ती मानकर (वय ५५) असे मृतकाचे नाव असून त्यांची पत्नी व मुलगा गेल्या काही वर्षांपासून विभक्त राहत होते. विठ्ठल मानकर हे मुलाचा पाकीट खर्च करीत होते. मात्र हाच लाड करणे त्यांच्या जिवावर बेतले.

 

Web Title: Life donor's blood is not paying for mobile recharge