शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

'सहकारमंत्र्यांकडे चोरांना पकडण्याचा लायसन्स'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 01:48 IST

सहकारमंत्र्यांकडेच चोरांना पकडण्याचा लायसन्स दिले गेले आहे,’ अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केली आहे.

सातारा : ‘राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांची ७७ कोटींची थकबाकी आहे. त्यांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही, त्यांनी राजीनामा द्यावा. सहकारमंत्र्यांकडेच चोरांना पकडण्याचा लायसन्स दिले गेले आहे,’ अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केली आहे.सातारा येथे पत्रकारपरिषदेत तुपकर म्हणाले, ‘राज्यातील साखर कारखान्यांकडे शेतकºयांची साडेपाच कोटींची थकबाकी आहे. एफआरपीच्या कायद्यानुसार ऊस घेतल्यापासून १४ दिवसांच्या आत उसाचे बिल शेतकºयांच्या खात्यात जमा करणे बंधनकारक असताना सर्वच कारखान्यांनी कायदा मोडला आहे. कोल्हापुरात झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एफआरपीच्या रकमेसाठी कारखान्यांना राज्याची तिजोरी मोकळी करेन, असे म्हटले होते. संबंधित कारखान्यांवर फौजदारी करणे अपेक्षित होते, तरीही देखील सरकार तटस्थ भूमिका घेत आहे. कष्टकºयांच्या बाजूने धोरण आखायला सरकार तयार नाही, साखर निर्यातीचा निर्णय शासन घेत नाही. एका बाजूला पंतप्रधान उत्पादन वाढविण्याचे आवाहन शेतकºयांना करत आहेत याउलट जास्त साखर उत्पादित केली, म्हणून ती समुद्रात बुडवू, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणतात. हे शासन निष्क्रिय आहे. शेती मालाला हमीभाव मिळावा, यासाठी स्वाभिमानीने साथ दिली होती. आता शेतकºयांचा उद्रेक सरकारला सोसावा लागेल’चंद्रकांत पाटील गप्पा मारणारा माणूसदुष्काळी उपाययोजनांबाबत सरकार असंवेदनशील आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील हा गप्पा मारणारा माणूस आहे. मोठे आकडे फुगवून सांगून हेडलाईनपुरते ते बोलतात. किती दुष्काळग्रस्तांच्या दावणीला त्यांनी चारा दिला? ५० टक्के जनावरे कत्तलखान्याकडे गेली. माणसं मेल्यावर लाखाची मदत करण्यात काय अर्थ आहे, असा सवालही तुपकर यांनी उपस्थित केला.विमा कंपन्यांचे मंत्र्यांशी साटेलोटेदुष्काळ ओढवला तरी सरकार शेतकºयांना साथ देत नाही. चारा छावणी उभी करण्याबाबत निर्णय होत नाही. शेतकºयांचे नुकसान झाले, त्यांना विमा रक्कम देणे अपेक्षित असताना कायदा धाब्यावर बसवून विमा कंपन्यांचे लाड पुरविले जातात. विमा कंपन्यांचे सरकारमधील मंत्र्यांशी साटेलोटे आहेत, असा आरोप तुपकर यांनी केला.

टॅग्स :Subhash Deshmukhसुभाष देशमुखSugar factoryसाखर कारखाने