शेतकऱ्यांची लूट करण्याचा खासगी कंपन्यांना परवाना - राधाकृष्ण विखे
By Admin | Updated: June 10, 2016 18:51 IST2016-06-10T18:42:38+5:302016-06-10T18:51:28+5:30
महाबीज या शासकीय कंपनीने बियांण्यांच्या दरात दुप्पट वाढ केली आहे. त्यामुळे आता खासगी कंपन्यांच्या बियाण्यांचेही भाव वाढतील. ही दरवाढ म्हणजे एक प्रकारे शेतकऱ्यांना लुटण्याचा खासगी

शेतकऱ्यांची लूट करण्याचा खासगी कंपन्यांना परवाना - राधाकृष्ण विखे
ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. १० - महाबीज या शासकीय कंपनीने बियांण्यांच्या दरात दुप्पट वाढ केली आहे. त्यामुळे आता खासगी कंपन्यांच्या बियाण्यांचेही भाव वाढतील. ही दरवाढ म्हणजे एक प्रकारे शेतकऱ्यांना लुटण्याचा खासगी कंपन्यांना दिलेला परवानाच आहे, अशी टीका विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी राज्य सरकारवर केली़.
नगर येथे पत्रकारांशी बोलताना विखे म्हणाले, सरकारने बियाणांची दरवाढ मागे न घेतल्यास राज्यभर सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. तसे आदेश काँग्रेस पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले असून, सरकारने बियाणे मोफत देण्याची घोषणा केली होती़. मात्र, शेतकऱ्यांना बियाणे मोफत देण्याऐवजी भरमसाठ भाववाढ केल्याचेही यावेळी राधाकृष्ण विखे म्हणाले.